https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
आरोग्य व शिक्षण

ज्येष्ठांच्या ‘सवलती’कडे रेल्वेचा काना डोळा रेल्वे प्रवाशी संघटना आपला तिसरा नेत्र कधी उघडणार

जेष्ठ नागरिकांचा केंद्रसरकारच्या रेल्वे प्रशासनाकडे आर्त टाहो

मानवत / प्रतिनिधी.

रेल्वे प्रवासात ज्येष्ठांना दिली जाणारी सवलत कोरोना काळात काढून घेण्यात आली, मात्र, या सवलती अजूनही पूर्ववत केल्या नाहीत. ज्येष्ठ नागरिकांच्या तिकीट भाड्यातील सवलतींच्या या रकमेतून दरवर्षी रेल्वे प्रशासनाला मात्र लाखो रुपयांचे वाढीव उत्पन्न मिळत आहे. सवलती देण्यास रेल्वे प्रशासन टाळाटाळ करीत असल्याने ज्येष्ठ नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
रेल्वेने प्रवास करणाऱ्या ५८ वर्षां पेक्षा अधिक वयाच्या महिलांना तिकीट दरात ५० टक्के आणि ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या पुरुष प्रवाशांना ४० टक्के सवलत दिली जात होती.

by

 

 

२०२० मध्ये कोरोनाचे संकट संपूर्ण जगावर निर्माण झाले. कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी लॉकडाऊन पुकारले होते. त्या काळात रेल्वे प्रशासनाने रेल्वे सेवा ही बंद केली होती. कालांतराने हे संकट कमी झाले. सर्व व्यवहार पूर्ववत झाले. रेल्वे सेवा ही पूर्ववत सुरू झाली आहे. मात्र, कोरोनापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सवलती रेल्वे प्रशासनाने अद्याप पूर्ववत केल्या नाहीत.
त्यामुळे
सरकारच्या रापमने हात केले सैल, केंद्राचा रेल्वे प्रशासनाचा आखडता हात }
*महाराष्ट्र शासनाने एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्या सर्व महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली आहे, तर ७५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास सवलत दिली आहे त्यामूळे राज्य सरकारचे सर्वत्र माय माऊल्याकडून कौतूक होत आहे तर जेष्टनागरिकामधून राज्यसरकारच्या सामाजीक बांधिलकी जाणिवेच्या निर्णयाचे अभिनंदन होत आहे .}}*जेष्ठ नागरिकांचा केंद्रसरकारच्या रेल्वे प्रशासनाकडे आर्त टाह       जेष्ठ नागरिकांचा केंद्रसरकारच्या रेल्वे प्रशासनाकडे आर्त टाहो

रेल्वे प्रशासन मात्र या सवलती देण्यास आखडता हात घेत असल्याने जेष्ठ नागरिकांतून नाराजी वाढत आहे. त्यामूळे ज्येष्ठांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. देवदर्शन करण्यासाठी असो किंवा मोठ्या शहरातील वैद्यकीय उपचार घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेच्या या सवलतींचा मोठा लाभ होत होता. तीन वर्षांचा कालावधी लोटला आहे; मात्र रेल्वेला ज्येष्ठांच्या सवलतींचा विसर पडला आहे. रेल्वे प्रशासन ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांवर गदा आणत असल्याचा आरोप ज्येष्ठ नागरिक करीत आहेत. यासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडे विचारणा केली असता, ज्येष्ठ नागरिकांना अद्याप ही सुविधा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.
जेष्ठ नागरिकांच्या सेवा सवलतीकडे *मुंग गिळून गप्प बसलेल्या रेल्वे प्रवाशी संघटना आपला तिसरा नेत्र उघडेल का ?* असा प्रश्न जेष्ठ नागरिकांतून विचारला जात आहे.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704