साहित्यिक

गडचिरोली येथे 8 तारखेला झाडी बोली कविसंमेलन

गडचिरोली,प्रतिनिधी :-

    झाडी बोली साहित्य मंडळ गडचिरोलीच्या वतीने येत्या रवीवारी 8 तारखेला गडचिरोली मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात कविसंमेलनाचे आयोजन केलेले आहे.

   सदर कार्यक्रमात झाडीबोली मंडळाने घोषीत केलेल्या साहित्य  व कलावंत क्षेत्रातील पुरस्काराचे वितरण तसेच आनंदराव बावणे लिखीत “स्वानंदगीत” या पुस्तकाचे प्रकाशन होईल. या कविसंमेलनात चंद्रपूर व गडचिरोलीचे ३० कवी निमंत्रित असून उपस्थित सर्व कवींना कविता सादर करण्याची संधी आयोजक देणार आहेत.

    तरी कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने कवीं, कवयित्री व रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन झाडी बोली साहित्य मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.अधिक माहिती साठी डॉ.चंद्रकांत लेनगुरे ९४२३६४६७४३ या भ्रमणध्वनीवर संपर्क करावे असे झाडी बोली साहित्य मंडळाने केले आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.