गडचिरोली,प्रतिनिधी :-
नगर परिषदेतील सत्ताधारी भाजप व विरोधी पक्ष कॉंग्रेस यांनी संगनमताने १३ जानेवारी २०२० रोजी कर वाढीचा ठराव पारीत केल्यामूळे अवाजवी घरटॅक्स वाढून आवाक्याच्या बाहेरचे बिल आले असल्याने वाढीव घरटॅक्स रद्द करण्यात यावे यासाठी वंचित बहुजन आघाडी शहर शाखेच्या वतिने नगर परिषदेवर १२ डिसेंबर रोजी हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार आहे.
वाढीव घरटक्स हे भाजप कॉंग्रेसचे महापाप असल्याने त्याचा भुर्दंड शहर वासियांना बसत आहे गडचिरोली नगर परिषद ब दर्जाची असल्याने अशी करवाढ करता येत नाही असा वंचित चा दावा आहे.
वाढीव घरटॅक्स रद्द झाले पाहिजे यासाठी शहरवासियांनी हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.