गडचिरोली,प्रतिनिधी :-
गडचिरोली वडसा रेल्वे मार्गाला मंजुरी मिळून अनेक वर्ष होत असून अजून पर्यंत रेल्वेचे काम प्रत्यक्षपणे सुरू न झाल्यामुळे जनतेमध्ये नाराजी आहे. या रेल्वे मार्गाकरिता केंद्र व राज्य सरकारनेही निधी उपलब्ध करून दिल्याने या रेल्वे मार्गाच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी तसेच गडचिरोली तेलंगाना नवीन रेल्वे मार्ग मंजूर करण्याची केली विनंती गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री नामदार रावसाहेबजी दानवे यांच्याशी चर्चा करताना केली.
यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेबजी दानवे यांनी ७६ टक्के जमिनींच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या ३ महिन्यांमध्ये उर्वरित २४ %जागेचे सक्तीने भूसंपादन करण्यात येणार आहे. त्यामुळे या रेल्वे मार्गाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती मंत्री महोदयांनी दिली.
या चर्चेदरम्यान आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी गडचिरोली तेलंगाना हा नवीन रेल्वे मार्ग मंजूर केल्यास जिल्ह्यातील जनतेला तेलंगाना व आंध्र प्रदेश राज्याला जोडण्याचा मार्ग सुकर होईल. त्यामुळे या मार्गाला देखील लवकरात लवकर मंजुरी मिळावी अशी मागणी या चर्चेच्या दरम्यान आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी मंत्री यांना केली.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते अरुण भाऊ हरडे प्रामुख्याने उपस्थित होते
Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.