https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
आरोग्य व शिक्षण

इंदिरा गांधी विद्यालयात विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन

चंद्रपूर,प्रतिनिधी :-

विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची गोडी निर्माण करुन त्यांच्यातील बुद्धिमत्तेला वाव देण्यासाठी 14 नोव्हेंबर 2022 रोजी बालदिनाचे औचित्य साधून पडोली येथील इंदिरा गांधी विद्यालयात विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनीचे उद्घाटन सुनील मुत्यालवार यांच्या हस्ते करण्यात आले. या विज्ञान प्रदर्शनात एकुण 37 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

यावेळी मुख्याध्यापक देवेंद्र मडावी, सुनिल मुत्यालवार, शिक्षक वरारकर,  कष्टी,  ढुमणे, चिंतलवार,  पेटकर,  काळे, श्रीमती आत्राम, श्रीमती चवले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली, यावेळी अध्यक्ष सुनिल मुत्यालवार यांनी उपस्थित सर्व शिक्षकांना व विद्यार्थ्यांना विज्ञान विषयक माहिती देत मोलाचे मार्गदर्शन केले.

या विज्ञान प्रदर्शनात अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशनतर्फे लो कॉस्ट मॉडेल, अगस्त्या मॉडेल, हार्ट व किडनी मॉडेल्स, रुम हिटर, पेन्सील वेल्डींग मशीन, लायटिंग कंडक्टर, सोलर सिस्टिम मॉडेल तसेच विज्ञान विषयक प्रतीकृती ठेवण्यात आल्या होत्या. तर वैज्ञानिक माहिती कॉर्नरमध्ये खगोल शास्त्रज्ञ, भौतिक शास्त्रज्ञ व गणित तज्ञ यांची महिती लावण्यात आली होती. या विज्ञान प्रदर्शनात शालेय विद्यार्थानी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यास शाळेतील विज्ञान शिक्षक-शिक्षिका तसेच अगस्त्या इंटरनॅशनल फाउडेंशनच्या पुजा चौधरी यांनी सहकार्य केले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704