एम सी आर
Uncategorized

राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन

नांदेड दि. ११ मार्च :- श्री गुरु गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे 11 ते 17 मार्च 2026 या कालावधीत पिंपळगाव महादेव (ता. अर्धापूर) येथे विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात सुमारे 100 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत.

या शिबिराचे उद्घाटन पिंपळगाव महादेवच्या सरपंच सौ. वर्षा शिवाजीराव खंडागळे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. सुभाष नामदेवराव कल्याणकर (संचालक, भा.च.सं.सा.का. येळेगाव), उपसरपंच उध्दवराव बालासाहेब कल्याणकर, कपील दुधमाने, संस्थेचे प्राचार्य व्ही. डी. कंदलवाड, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती हिंगोले, ग्रामविकास अधिकारी एकनाथ कदम, राम कल्याणकर, गोविंद कल्याणकर तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक, शिबिरार्थी व संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.

उद्घाटन प्रसंगी मनोगत व्यक्त करताना प्राचार्य व्ही. डी. कंदलवाड यांनी ‘स्वच्छ व हरित भारत’ या संकल्पनेवर आधारित या शिबिरामध्ये स्वयंसेवकांच्या माध्यमातून ग्रामस्वच्छतेचे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच अशा निवासी शिबिरांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सेवा भाव, सामाजिक जाणीव आणि जबाबदारीची भावना विकसित होते, असेही त्यांनी नमूद केले.

या शिबिरादरम्यान ग्रामस्वच्छता, रस्ते दुरुस्ती, साक्षरतेचे महत्त्व, आरोग्य शिबिर, वृक्षारोपण तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी दिनेश पोतदार यांनी स्पष्ट केली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्र. गटनिदेशक मोहन कलंबरकर यांनी केले.
०००००

Share

Related posts

यशवंत ‘ मधील श्रेयस चव्हाण यांची भारतीय नौसेनेमध्ये निवड

Chief Editor

महाराष्ट्र शासनाच्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सदस्य सचिव पदी शिवा कांबळे यांची निवड

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठाच्या वतीने शिवराम लुटे यांचा सत्कार

Chief Editor

मांडवी पोलिसांची मोठी कारवाई पिंपळगाव फाटा शिवारात जुगार व मटका हद्द्यावर धाड दहा जनावर गुन्हा दाखल एक लाखाचा मुद्देमाल जप्त

Chief Editor

दिनांक 07 जानेवारी 2026 रोजी बी.सी.ए. विभागाकडून Data Science व AI या विषयावर एक दिवसीय विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन

Chief Editor

मुखेड तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के पालकमंत्री अतुल सावे प्रशासनाच्या संपर्कात; परिस्थितीवर लक्ष

Chief Editor

Leave a Comment