शिवसेनेत सईद खान यांच्या सह राष्ट्रीय काॅग्रेसचे अनेक पदाधिकारी दाखल*

correspondent / Anil chavan.
mcr.news / manawat
———————————————
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून राजकीय पूनर्वसन करण्याचा ‘शब्द’ मिळाल्याने सईद खाॅन यांच्यासह राष्ट्रीय काॅग्रेसचे पदाधिकारी शिवसेनेत दाखल विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून पाथरी मतदारसंघात तिकीट न मिळाल्याने शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश अध्यक्ष सईद खान यांनी पदाचा राजीनामा देऊन रासपकडून विधानसभा निवडणूक लढविली होती.
सईद खाॅन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते निकटवर्तीय समजले जात असल्याने निवडणुकी झाल्यानंतर दोन महिन्यात सईद खान यांना राजकीय पूनर्वसन करण्याचा ‘शब्द’ मिळाल्यानंतर मुंबईत सईद खान यांनी शिवसेनेत कार्यकर्त्यांसह प्रवेश करत घरवापसी केली आहे.
—————————————————
*(( काँग्रेस शहराध्यक्षांसह आजी, माजी पदाधिकारी यांच्यासह नगरसेवक ही शिवसेनेत दाखल झाल्यामूळे मानवत शहरातून विरोधक हद् पार झाल्याची चर्चा होतांनी दिसत आहे. ))*
————————————————
*}}} मानवत : नगरपालिका निवडणुकी च्या तोंडावर बाजार समिती माजी संचालक दिनेश कोक्कर, माजी नगर सेवक बालाजी कुर्हाडे, अॅड. सतिष चव्हाण यांच्यासह माजी नगरसेवक अ. रहीम अ. करीम, गोपाळ गौड, माजी स्वीकृत नगरसेवक बालाजी गोलाईत, शहराध्यक्ष शाम चव्हाण, सीमा सारडा, शैलेश वडमारे, व्यंकटेश चौधरी, किशोर चव्हाण, युनूस मिलनवाले, शैलेश कब्रूवार, जनार्दन कीर्तने, असेफ खान, अफरोज लाला, प्रदीप अग्रवाल यांनी सईद खान यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. }}*
पाथरी मतदारसंघात दोन वर्षात
सईद खान यांनी शिवसेना पक्षसंघटना बांधणीचे काम केले होते. निवडणुकीत त्यांना महायुतीकडून शिवसेनेचे तिकीट मिळेल, अशी अपेक्षा होती. एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यांना उमेदवारीचा ‘शब्द’ देण्यात आला होता. मात्र, महायुतीमध्ये जागा
राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्याने त्यांनी रासपकडून निवडणूक लढविली. यात त्यांचा पराभव झाला. ५५ हजार मते मिळवत त्यांनी राजकीय लक्ष वेधून घेतले. सईद खान यांची शिवसेनेत घरवापसी होणार, अशी चर्चा होती. मागील १५ दिवसांपूर्वी त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.
***