गडचिरोली,प्रतिनिधी :-
आरोग्य विभागात पारडी आरोग्य केंद्रातील कार्यरत असलेले व गेल्या 25 वर्षा पासून संस्कृतीक प्रबोधन व निरंतर विविध उपक्रमातुन सामाजिक कार्य करीत असले विवेक विरदास मून व सौ. ग्रीष्मा विवेक मून यांना पद्दमश्री पोपटरावं पवार सर यांच्या हस्ते पुणे येथे “गडचिरोली भूषण ” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सदर सत्कार सोहळा हा पुणे येथील अण्णा भाऊ साठे सभागृह येथे दि.26 नोव्हेंबर 2022रोजी ग्लोबल स्कॉलर अकॅडमी पुणे या नामांकित संस्थे मार्फत आयोजित करण्यात आला होता.
मून दाम्पत्य हे विविध उपक्रमा द्वारे सामाजिक कार्यात विशेष उल्लेखनीय कार्य करती राहतात त्या बद्दल पदमश्री पोपटरावं पवार सर, ग्लोबल फाउंडेशन चे अध्यक्ष सुनील बेलगावे व गडचिरोली हितचिंतक मित्र परिवार यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत.
Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.