https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

युवकांनी ग्रामीण संस्कृती समजून घेऊन ग्रामीण विकासात योगदान द्यावे – प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे

नांदेड:(दि.९ जानेवारी २०२४)
खरा भारत खेड्यात आहे. भारताचा विकास साध्य करायचा असल्यास खेड्यांचा विकास झाला पाहिजे. याकरिता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ग्रामीण संस्कृती समजून घेतली पाहिजे.त्या संस्कृतीचा अभ्यास केला पाहिजे आणि जबाबदार नागरिक म्हणून आपले उत्तरदायित्व जबाबदारीने निभावले पाहिजे; तरच युवकांचा समाज विकासात खऱ्या अर्थाने हातभार लागेल, अशी भूमिका यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केली.
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास या करीता युवक शिबीर दि.०७ जानेवारी ते १३ जानेवारी या कालावधीत मौजे मरळक,ता.जि. नांदेड येथे संपन्न होत आहे. या सोहळ्याप्रसंगी ते दि.८ जानेवारी रोजी विचार व्यक्त करत होते.

याप्रसंगी विचारमंचावर अध्यक्ष मरळक गावच्या सरपंच श्रीमती श्रीमंताबाई नारायण पोहरे तर प्रमुख उद्घाटक म्हणून श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव माजी प्राचार्य डॉ.रावसाहेब शेंदारकर,
रासेयो विभाग स्वा.रा.ती.म. विद्यापीठ, नांदेडचे संचालक प्रो.डॉ.मल्लिकार्जुन करजगी, योगानंद स्वामी महाविद्यालय, वसमतचे प्रमुख व्याख्याते प्रो.डॉ.तोळमारे एस. एस. तसेच मरळक गावचे उपसरपंच बालाजी नामदेवराव कदम, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती गंगाधरराव धोंडजी कदम,
राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ.बालाजी भोसले, डॉ.दिगंबर भोसले, प्रा.मीरा फड, प्रा.अभिनंदन इंगोले, प्रा.कांचन गायकवाड, डॉ.कैलास इंगोले, प्रा. राजरत्न सोनटक्के,प्रा.राजश्री जी.भोपाळे आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजनेचे निवासी शिबिराचा उद्घाटन सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ.बालाजी भोसले यांनी तर सूत्रसंचालन डॉ.दिगंबर भोसले यांनी केले. शेवटी आभार प्रा.अभिनंदन इंगोले यांनी मानले.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका डॉ.एल.व्ही.पदमाराणी राव, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, प्रसिद्धी समिती समन्वयक डॉ.अजय गव्हाणे आदींनी सहकार्य केले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704