स्वामी विवेकानंद शैक्षणिक संकुलात मराठवाडा मुक्ती संग्राम व विद्यापीठ वर्धापन दिन साजरा

—————————————–
उदगीर :- येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ, उदगीर या शैक्षणिक संकुलात जय हिंद पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज, स्वामी विवेकानंद महाविद्यालय, स्वामी विवेकानंद फार्मसी कॉलेज, स्वामी विवेकानंद नर्सिंग कॉलेज, फ्लॉरेन्स कॉलेज ऑफ नर्सिंग लातूर, स्वामी विवेकानंद अध्यापक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ वर्धापन दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रारंभी सकाळी 8:35 वाजता संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. सुधीर जगताप यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज तर अध्यापक महाविद्यालयांचे प्राचार्य डॉ. गोपाळ पवार यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेच्या प्रशासकीय अधिकारी तथा जय हिंद पब्लिक स्कूलच्या प्राचार्या ज्योती स्वामी, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. गणेश तोलसरवाड, अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य संजय हट्टे, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या ज्योती तारे, स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शेषनारायण जाधव, रासेयोचे कार्यक्रम अधिकारी,जय हिंद स्कूलच्या रिंग्नम विश्वकर्मा, उपप्राचार्य दिग्विजय केंद्रे, उपप्राचार्य प्रिन्सी बी,नॅबेटच्या समन्वयक मनोरमा शास्त्री, सतीश वाघमारे, रासेयोचे कार्यक्रमाधिकारी प्रा.अमर तांदळे, पत्रकारिता व परीक्षा विभागाचे प्रमुख प्रा. राहुल पुंडगे, विठ्ठल कारंजे, महेश हुलसुरे, सादिक शेख, श्रावण जगताप यांच्या सह संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.