यशवंत मध्ये आण्विक जीवशास्त्र तंत्रज्ञानावरिल कार्यशाळा उत्साहात संपन्न

नांदेड:( दि.१८ सप्टेंबर २०२५)
यशवंत महाविद्यालयात पीएम उषा योजनेअंतर्गत जैवतंत्रज्ञान विभागाद्वारे माजी प्र-कुलगुरु प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार मूलभूत आण्विक जीवशास्त्र तंत्रज्ञानावर दोन दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.
कार्यशाळेच्या उद्घाटकीय सत्राचे प्रमुख अतिथी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगरचे डॉ.जे. ए. कुलकर्णी होते. अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. यांनी भूषविले.प्रमुख उपस्थिती डॉ.रमेश चिल्लावार यांची होती.
बीजभाषक डॉ.जे.ए.कुलकर्णी यांनी, जैवतंत्रज्ञान व निदानशास्त्रात आण्विक जीवशास्त्राच्या अनुप्रयोगांचा उहापोह केला.प्रयोगशाळेत काटेकोरपणा, नैतिकता आणि सततचे शिक्षण यांचा अंगीकार करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी, विद्यार्थ्यांनी आण्विक जीवशास्त्राचे ठोस सिद्धांतिक ज्ञान आणि प्रत्यक्ष प्रयोगशीलता आत्मसात करण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले.
प्रारंभी प्रास्ताविकात डॉ. एम.एम. व्ही. बेग यांनी, आण्विक जीवशास्त्राचे आधुनिक संशोधनातील महत्त्व अधोरेखित केले तसेच संकल्पनात्मक आकलनाबरोबर कौशल्य विकास आवश्यक असल्याचे देखील सांगितले.
सूत्रसंचालन डॉ.बी.वाय. गोट्टीगोला यांनी केले तर आभार सौ. एस. वाय. लोखंडे यांनी मानले.
कार्यशाळेत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील बायोइन्फॉर्मेटिक्स विभागप्रमुख डॉ.ए.बी. गुलवे, विवेकानंद महाविद्यालय, उदगीर येथील डॉ.एम. एन.कोठारी, अँपिकॉन बायोसिस्टीम, हैदराबाद येथील डॉ. खुशाल वांगडले यांनी अमूल्य मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत जवळपास १४१ विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक व प्रयोगशाळा कर्मचारी सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ. हरिश्चंद्र पतंगे, डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने आदींनी सहकार्य केले.