यशवंत ‘ बास्केटबॉल क झोन अंतर महाविद्यालय स्पर्धा यशवंत महाविद्यालयात संपन्न

नांदेड – (१५ सप्टेंबर २०२५)
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन क झोन बास्केटबॉल मुले व मुली स्पर्धा या यशवंत महाविद्यालय, नांदेड येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये एकूण मुलांचे सात व मुलींचे चार संघ सहभागी झाले होते. उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे मॅडम या उपस्थित होत्या तसेच उद्घाटक म्हणून डॉ. बालाजी जाधव, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. जुजारसिंग शिलदार, डॉ. विक्रम कुंटूरवार, डॉक्टर जयदीप कहाळेकर हे उपस्थित होते, डॉ. जुजारसिंग शिलेदार यांनी खेळांचे महत्त्व मानवी जीवनात अतिशय आवश्यक आहे असे उद्गार काढले, उद्घाटन डॉ. बालाजी जाधव यांनी आपल्या भाषणात बास्केटबॉल या खेळाचे यशवंत महाविद्यालयाचे योगदान बद्दल खेळाडूंना माहिती दिली , उपलब्ध असलेल्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सुविधेचा जास्तीत जास्त खेळाडूंनी लाभ घ्यावा असे आवाहन केले, अध्यक्षीय समारोपात डॉ. कविता सोनकांबळे मॅडम यांनी खेळाडूंना खेळाडू वृत्तीचे प्रदर्शन करण्यासाठी आव्हान केले .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. ज्योत्स्ना वाघ हिने केले प्रस्तावित डॉ. मनोज पैंजणे यांनी केले आभार प्रदर्शन कु. प्रीती लाटे यांनी केले,
या स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे: मुलांच्या गटात प्रथम क्रमांक एस जी जी एस इंजीनियरिंग, नांदेड संघाने प्राप्त केला, द्वितीय क्रमांक यशवंत महाविद्यालय नांदेड या संघाने प्राप्त केला व तृतीय क्रमांक सायन्स कॉलेज नांदेड या संघाने प्राप्त केला, मुलींच्या गटामध्ये प्रथम क्रमांक वसंतराव नाईक कॉलेज सिडको नांदेड संघाने प्राप्त केला द्वितीय क्रमांक एस जी जी एस इंजीनियरिंग कॉलेज नांदेड संघाने प्राप्त केला व तृतीय क्रमांक यशवंत महाविद्यालय, नांदेड च्या संघाने प्राप्त केला, स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉक्टर गजानन कदम, डॉक्टर अर्जुन सिंग ठाकूर, प्रा. उत्तम केंद्र प्रा. राहुल टिचकुले , राजू राऊत, शुभम, उमेश गजभारे यांचे सहकार्य लावले स्पर्धेचे स्वीकारण्यासाठी खालील पंचांनी कामगिरी केली सुहास कांबळे, विष्णू शिंदे, विकास मेहकर सोहम सोनकांबळे, नागसेन वाढवे, प्रा. शुभम कोकुळवार
सर्व विजयी संघाचे माजी प्र-कुलगुरु प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे डॉ. हरिश्चंद्र पतंगे यांनी शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
या संघातर्फे अतिशय चांगली कामगीरी केलेल्या खेळाडूंची निवड ही स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाच्या संघासाठी होईल.
अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयीका डॉ.एल.व्ही. पदमाराणी राव, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे तसेच सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.