ताज्या घडामोडी

स्वारातीम वि‌द्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिक देऊन १८ सप्टेंबर रोजी होणार गौरव

नांदेड:
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त प्रतिवर्षी पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या गुणवंत विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या परीक्षा विभागामार्फत रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येत असते. यावर्षी विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त दि.१८ सप्टेंबर रोजी आयोजित कार्यक्रमात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सर्व विद्याशाखेतील ५२ गुणवंत विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे यांनी कळविले आहे.
विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील पदवी अभ्यासक्रमातील गुणवंत विद्यार्थी स्नेहल पांचाळ यांनी दोन रोख पारितोषिक प्राप्त केली आहेत. सागर गोरगीळे, जहीर काजी, नाजिया शेख, वैष्णवी साकोळे, आदित्या उरगुंडे, दीप्ती शिंदे, गायत्री चव्हाण, पार्वती सावंत, शारदा गिल्डा आणि रत्नशील सोनकांबळे या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तर पदव्युत्तर अभ्यासक्रमातील गुणवंत विद्यार्थी अवंतिका पवार यांनी तीन, दुरानी हुद्दा यांनी दोन रोख पारितोषिके प्राप्त केली आहेत. अकिब अहेमद, फारुकी तमकीन, मनियार मारियाम, वैष्णवी मीठपल्ले, आरती रोडगे आणि स्वाती कदम यांना प्रत्येकी एक रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेतील पदवी अभ्यासक्रमातील गुणवंत विद्यार्थी बलजिंदरकौर कांचवाले यांनी तीन रोख पारितोषिके प्राप्त केली असून अंजुम शेख, ऐश्वर्या लांडगे, अरफत खान आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमातील प्रीती कारभारी, मनदीप तुलसाणी, मो. लबीब सिद्दिकी यांना प्रत्येकी एक रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
मानव्य विज्ञान विद्याशाखेंतर्गत पदवी अभ्यासक्रमातील गुणवंत विद्यार्थी अदिती कुलकर्णी व ऐश्वर्या कुलकर्णी यांना प्रत्येकी चार, सरस्वती लंगुटे व ऐश्वर्या कांबळे यांना प्रत्येकी तीन रोख पारितोषिकांनी सन्मानित करण्यात येणार आहे. काशीबाई गिरी, अवंतिका यादव, श्रद्धा जाधव, सानिया मासुलदार, अंकिता बडदे, जिगीषा देशपांडे आणि वैशाली अकुलवाड प्रत्येकी एक रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तर पदव्युतर अभ्यासक्रमातील गुणवंत विद्यार्थी ज्योती मोतीपोळे यांना तीन, गायत्री सोळुंके, अपूर्वा नवले, सुषमा पाटील, व्यंकट पांचाळ, कल्पना गाजरे, काजल वाघमारे यांना प्रत्येकी दोन रोख पारितोषिक प्राप्त केली आहेत. शिल्पा गोरे, पूजा कांबळे आणि भीमराव बुक्तळरे यांना प्रत्येकी एक रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
अंतर विद्याशाखीय अभ्यास मंडळ विद्याशाखेतील पदवी अभ्यासक्रमातील गुणवंत विद्यार्थी प्रियंका लोखंडे आणि पदव्युतर अभ्यासक्रमातील हरिष सागर, नरसिंग बुगडे, सयदा तय्यबा आणि संघमित्रा गोणारकर यांना प्रत्येकी एक रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त दि.१८ सप्टेंबर रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिक वितरण समांरभ आयोजित करण्यात आल्याची माहिती कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार यांनी दिली.
——————————————–

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.