यशवंत ‘ मध्ये उद्योगातील कौशल्याचे मार्गदर्शन संपन्न

नांदेड:(१७ सप्टेंबर २०२५):
यशवंत महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग व सीआयसी यांच्या वतीने दि.१५ व १६ सप्टेंबर रोजी पीएम उषा योजनेअंतर्गत आयोजित दोन दिवसीय विश्लेषणात्मक उपकरणांच्या प्रत्यक्ष प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ.एम.ए. बशीर होते तर तज्ञ मार्गदर्शक ठाणे,मुंबई येथील वाशीकर फार्मा कंपनीचे संचालक तथा यशवंत महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ.सुधीर कुंभार होते.
कार्यशाळेस यशवंत महाविद्यालय व नांदेड फार्मसी कॉलेज येथील ११० पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थी विदयार्थी सहभागी झाले होते.
प्रशिक्षणाचा उद्देश विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणे तसेच विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यात सुधारणा करणे होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन सरस्वतीपूजन व दीपप्रज्वलनाणे झाले. कार्यशाळेचे समन्वयक डॉ.सुभाष बी.जुन्ने यांनी दोन दिवसीय कार्यशाळेची रूपरेषा व उद्देशाबद्दल विस्तृत प्रस्तावना केली.डॉ.एम. ए.बसीर यांनी विभागातील विविध उपक्रमाविषयी माहिती दिली.
अध्यक्षिय समारोपात प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांनी, रसायनशास्त्र विभाग व कार्यशाळा आयोजक यांचे अभिनंदन केले आणि विद्यार्थ्यांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घेऊन भविष्यामध्ये संशोधन क्षेत्रात तसेच मोठमोठ्या औद्योगिक कंपनीमध्ये या कार्यशाळेतील प्रशिक्षणाचा उपयोग करून आपले व आपल्या महाविद्यालयाचे नाव उज्वल करावे, असा संदेश दिला तसेच अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रात उत्तम संधी मिळतील, असा आशावाद देखील व्यक्त केला.
याप्रसंगी विचारपीठावर रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ.एम.ए.बसीर, समन्वयक डॉ.सुभाष जुन्ने, सीआयसी समन्वयक डॉ.एस.पी.वर्ताळे यांची उपस्थिती होती.
सूत्रसंचालन डॉ.विजय भोसले यांनी केले तसेच आभार देखील मानले.
दोन दिवशीय कार्यशाळेत पहिल्या दिवशी डॉ.सुधीर कुंभार यांनी, सोफिस्टिकेटेड फार्मासिटिकल ऍनाल्तिकल इन्स्ट्रुमेंट्स अँड एप्लिकेशन्स ऑफ जीसीएमएस व एचपीएलसी विषयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील औषधनिर्माणशास्त्र शाखेचे डॉ.टी.एम.कल्याणकर यांनी, एनालायटीकल मेथडस डेव्हलपर बाय स्पेक्ट्रोस्कोपी या विषयावर विद्यार्थ्यांना एफटीआयआर व एचपीटीएलसी यावर प्रत्यक्षिकासह विस्तृत मार्गदर्शन केले.
दुसऱ्या दिवशीच्या प्रथम सत्रात श्री.गुरुगोविंद सिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालय,नांदेड येथील डॉ.पौर्णिमा तलेले यांनी, अटोमिक ऑब्झर्शन स्पेक्ट्रोस्कोपी इन इंडस्ट्री या विषयावर मार्गदर्शन केले. शेवटच्या सत्रात नांदेड फार्मसी कॉलेजचे डॉ.आशिष बी.रोगे यांनी, प्रिन्सिपल्स अँड अपलिकेशन्स ऑफ यूव्ही स्पेक्ट्रोस्कोपी अँड स्पेक्ट्रोप्लोरोमेट्री या विषयावर मार्गदर्शन केले.
सर्व विद्यार्थ्याना दुसऱ्या दिवशीच्या सत्रामध्ये ॲटॉमिक ऑब्झर्शन स्पेक्ट्रोस्कोपी, जीसीएमएस, एचपीएलसी, युव्ही, आयआर स्पेक्ट्रोस्कोपी या सर्व उपकरणांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले.
कार्यशाळा समारोपप्रसंगी उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ.एम.एम.व्ही. बेग, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ.एम.ए.बशीर यांची उपस्थिती होती.
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी समन्वयक डॉ.सुभाष बी.जुन्ने, सीआयसी समन्वयक डॉ.संभाजी वर्ताळे, डॉ.विजय भोसले, डॉ.संदीप खानसोळे, डॉ.शिवराज शिरसाट, डॉ.कविता केंद्रे, डॉ.निलेश चव्हाण, डॉ. दत्ता कवळे, डॉ.मदन अंभोरे, प्रा. संतोष राऊत, डॉ.अनिल कुंवर, प्रा. शांतुलाल मावसकर, शिक्षकेतर कर्मचारी आनंद चंदेल, किशनराव इंगोले, गोविंद शिंदे, विठ्ठल इंगोले, ज्ञानदेव साखरे, मारोती बत्तलवाड, ओम आळणे आदींनी परिश्रम घेतले तसेच उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने यांनी सहकार्य केले.
समारोप सत्राचे सूत्रसंचालन डॉ.मदन अंभोरे यांनी केले तर आभार डॉ. दत्ता कवळे यांनी मानले.
समारोप सत्रानंतर सहभागी विद्यार्थ्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया नोंदवल्या. उपस्थितांना प्रमाणपत्र वितरणाने कार्यशाळेची सांगता झाली.