स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचा बुगडे नरसिंग शिवाजी विद्यापीठातून सर्व प्रथम

उदगीर:- येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील पत्रकारिता व जनसंवाद या अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिकणारा विद्यार्थी बुगडे नरसिंग शिवाजी हा उन्हाळी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या पदव्युत्तर परीक्षेत सर्वाधिक गुण घेऊन विद्यापीठातून सर्व प्रथम आला आहे.
सदरील विद्यार्थ्याला विद्यापीठ वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलगुरू, प्र- कुलगुरु, यांच्या उपस्थितीत मान्यवराच्या हस्ते श्री. सुधीर तुंगार सचिव, पत्रमहर्षी तुंगार प्रतिष्ठान नांदेड यांनी प्रायोजित केलेला स्व. पत्रमहर्षी हरी सखाराम तुंगार आर्यसेवक रोख पारितोषिक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे
विद्यार्थांनी मिळवलेल्या यशाबद्दल स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. सुधीर जगताप,संस्थेच्या प्रशासकीय अधिकारी ज्योती स्वामी, संस्थेच्या एच.आर.मॅनेजर स्नेहा लांडगे,उपप्राचार्य डॉ. शेषनारायण जाधव, पत्रकारिता व जनसंवाद विभागाचे प्रमुख प्रा. राहुल पुंडगे, रासेयोचे कार्यक्रमाधिकारी प्रा. अमर तांदळे, संगणक शास्त्र विभागाचे प्रभारी प्रा. राशेद दायमी, प्रा.उस्ताद मोहम्मद, प्रा. असिफ दायमी, प्रा. वैष्णवी गुंडरे, प्रा. नम्रता कुलकर्णी, प्रा. नावेद मणियार, प्रा. अनुजा चव्हाण, प्रा. रोहिणी वाघमारे, प्रा. सचिन तोगरीकर, शीतल तोगरीकर, उषा गायकवाड,अमोल भाटकुळे, अपर्णा काळे, बायडी वाघमारे यांच्या सह सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.