जय हिंद पब्लिक स्कूल मध्ये मुलींसाठी ‘गुड टच-बॅड टच’ विषयावर सेमिनार संपन्न

—————————————
उदगीर :- येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जय हिंद पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज तसेच इनरव्हील क्लब उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुधीर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 16 सप्टेंबर 2025 रोजी पहिली ते सहावी वर्गात शिकणाऱ्या मुलींसाठी ‘गुड टच-बॅड टच ‘ या विषयावर विशेष सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. या सेमिनार मध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून
इनरव्हील क्लब उदगीरच्या प्रीती दुरुतकर तर कार्यक्रमांच्या अध्यक्षा म्हणून संस्थेच्या प्रशासकीय अधिकारी व जय हिंद पब्लिक स्कूलच्या प्राचार्या ज्योती स्वामी होत्या. यावेळी व्यासपीठावर पल्लवी मुक्कावार, मीरा चमबुले, मानसी मॅडम, तुलसी मॅडम, डॉ. प्रियंका मॅडम, उपप्राचार्यां रिंग्नम विश्वकर्मा,
नॅबेटच्या समन्वयक मनोरमा शास्त्री यांची प्रमुख उपस्थिती होती.
या सेमिनार मध्ये मार्गदर्शन करताना प्रीती दुरुतकर म्हणाल्या की, आज मुला- मुलींना वयात येत असताना काही गोष्टी सांगणे काळाची गरज बनली आहे. प्रत्येक पालक, शिक्षक यांनी आपल्या स्तरावर गुड टच-बॅड टच विषयी माहिती देणे गरजेचे आहे. कोणता व्यक्ती कोणत्या हेतूने स्पर्श करीत आहे. हे मुलींना समजले पाहिजे. कारण दिवसें दिवस मुलींवरील अत्याचारात वाढ होत आहे. हे थांबविण्यासाठी असे सेमिनार आयोजित करणे काळाची गरज आहे असे ही त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोपात ज्योती स्वामी म्हणाल्या की, मुलींना कोणता स्पर्श गुड आणि कोणता बॅड हे माहीत पाहिजे. जर एखाद्या व्यक्तीने केलेला स्पर्श तुम्हाला आवडला तर त्याला गुड टच व नाही आवडला तर बॅड टच असे समजावे.
यासाठी त्यांनी विविध उदाहरण देत माहिती दिली तसेच पालकांनी देखिल याबाबत जागरूक रहावे असे ही त्या म्हणाल्या.
सदरील सेमिनारचे सूत्रसंचालन व आभार भाग्यश्री वांगवड यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय हिंद पब्लिक स्कूलच्या सर्व शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.