https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मानवत शहरातील गोलाईत नगर मधील रस्त्याचा दोन्ही बाजूने नालीचे काम तात्काळ करा : रविभाऊ पंडित.

मानवत / प्रतिनिधी.

मानवत शहरातील गोलाईत नगर मधील रस्त्याचा दोन्ही बाजूने नालीचे काम तात्काळ करण्यात यावे अशी मागणी मानवत येथील सामाजिक कार्यकर्ते रवि भाऊ पंडित यांनी मानवत नगर परिषदेचा मुख्याधिकारी तथा प्रशासक यांच्या कडे २६ डिसेंबर रोजी एका निवेदनाद्वारे केली आहे. शहरातील गोलाईत नगर मधील एस. बी. आय. बँकेचा ए. टी. एम. समोर तसेच के. के. एम. कॉलेज रोडचा रोडचे काम सुरु असून या रस्त्याचा दोन्ही बाजूस नालीचे काम तात्काळ करावे सदरील महाराणा प्रताप चौका पासून सर्व रोडचे आणि इमारतीचे पाणी महात्मा फुले नगर (दलित वस्ती ) मध्ये घुसत असल्यामुळे तेथील नागरिकांचा घरामध्ये जात आहे त्या मुळे येथील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेली अनेक वर्षापासून महात्मा फुले नगर मध्ये महाराणा प्रताप चौकापासून ते सर्व रोडचे आणि इमारतीचे पाणी या ठिका णी जात आहे तसेच रोडचे काम सुरु असून त्या दोन्ही बाजूने नालीचे काम लवकरात लवकर करण्यात यावे अन्यथा लोकशाही मार्गाने अमरण उपोषण करण्यात येईल व उपोषणा दरम्यान काही जीवित हानी झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी हि नगर पालिका प्रशासनाची राहील असा ईशारा हि निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते रवि पंडित यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704