https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

एम सी आर न्यूज कवयित्री आपल्या भेटीला: कोरडा दुष्काळ:लैलेशा भुरे

एम सी आर न्यूज कवयित्री आपल्या भेटीला: कोरडा दुष्काळ

                कोरडा दुष्काळ

 

 

 

शेतक-यांच्या जीवनात आला
दुर्धर वेदनेचा काळ
सगळीकडे दिसतो पसरला
पाण्याचा दुष्काळ

 

पाणी न मिळे पिकास
भेगाळलेले रानोमाळ
शेतकरी टक लावून पाहे
जसा पाहतो चातक आभाळ

माणूस,जनावर,झाडे
होते सगळ्यांचीच आबाळ
पाहताना रडू फुटे
जेव्हा जळाला पेरलेला माळ

 

तोडचा घास पळाला
सर्वत्र कोरडा दुष्काळ
कसे रूप घेतले धरतीने
काय ठरवेल भविष्यकाळ

डोईवर निराशेचे ओझे
पावसाची आस त्रिकाळ
पडले सुके घडले विपरीत
पडला माणुसकीचा दुष्काळ
**************************
लैलेशा भुरे
नागपूर

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704