स्वामी विवेकानंद कॅम्पस मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

—————————————
उदगीर:- येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालय, स्वामी विवेकानंद फार्मसी कॉलेज,स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ नर्सिग यांच्या संयुक्त विद्यमाने व स्वामी विवेकानंद महविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. सुधीर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातील आद्य समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठया उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.गणेश तोलसरवाड, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या ज्योती तारे, उपप्राचार्य डॉ.शेषनारायण जाधव, रासेयो चे कार्यक्रमाधिकारी प्रा.अमर तांदळे, पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा. राहुल पुंडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुरूवातीला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेेस प्राचार्य डॉ.गणेश तोलसरवाड,प्राचार्या ज्योती तारे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपप्राचार्य डॉ.शेषनारायण जाधव यांनी आपल्या मनोगतात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन व कार्यावर विचार मांडले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. राहुल पुंडगे तर आभार प्रा. अमर तांदळे यांनी मानले. यावेळी प्रा. रशीद दाईमी, प्रा.श्रीपाद अहंकारी, प्रा.नवनाथ बेंडके, प्रा.विष्णु पाटील, प्रा.दिग्विजय केंद्रे, प्रा.आसिफ दाईमी, प्रा.शिवराज सूर्यवांशी, ग्रंथपाल अजय रांगवळ, अमोल भाटकुळे, वैभव बिडवे, संदेश गवले यांच्या सह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.