जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना प्रशासकीय रत्न पुरस्कार.

नांदेड (प्रतिनिधी) नांदेडचे माजी जिल्हाधिकारी, एक कुशल प्रशासक अभिजीत राऊत यांचा नांदेड येथील कार्यकाळ यशस्वीरित्या नुकताच पूर्ण झाला. आपल्या विचारांची व कर्तृत्वाची महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर छाप असलेले बहुआयामी, सर्वव्यापी, सर्वस्पर्शी असे महाराष्ट्राला लाभलेले वरदान म्हणजे मा. अभिजित राऊत साहेब. अल्पावधीतच मा. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे प्रशासकीय सेवेच्या तारांगणातला एक चमकता तारा म्हणून नावारुपाला आले. जटिल समस्येला साध्या सोप्या मार्गाने सोडवण्याचा त्यांचा जणू हातखंडाच आहे. निर्भीड निष्कलंक व संयमी प्रशासनाचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून महाराष्ट्र अभिजीत राऊत यांच्याकडे पाहतोय. त्यांच्या प्रशासकीय, सामाजिक, व कृषी क्षेत्रातील कर्तृत्वाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ओझोन फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांचा प्रशासकीय रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या पुरस्कार वितरण प्रसंगी नूतन जिल्हाधिकारी मा. राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक मा. अबीनाश कुमार, महानगरपालिका आयुक्त मा. डॉ. महेशकुमार डोईफोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मा. अभिजित राऊत साहेब यांनी कोरोना काळात अत्यंत धिरोदात्त पद्धतीने न भूतो न भविष्यती आलेली आपत्ती प्रभावीपणे हाताळून जनसामान्याच्या दुःखाचे कैवारी झाले ही नक्कीच सामान्य गोष्ट नाही. त्याचबरोबर अन्नदात्या शेतकऱ्यासाठी स्वतः बांधावर जाऊन अनेक योजना त्यांच्या भल्यासाठी राबवून आपले उत्तरदायित्व निभावले यासाठी नक्कीच शेतकरी वर्ग आपला कृतज्ञ आहे. प्रधानमंत्री ग्राम आवास योजने अंतर्गत निवारा नसलेल्या लोकांना निवारा मिळवून देण्यात किती ही आपली धडपड?? याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने आपल्याला महाराष्ट्रातील उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून ही पुरस्काराने गौरविण्यात आले. जलसंधारणाच्या माध्यमातून पाण्याचे यशस्वी व्यवस्थापन असो की उन्हाळ्यात कोणत्याही घटकाला पाणी कमी पडू नये यासाठी अहोरात्र केलेली धडपड ही कायम नांदेड वासीयाच्या हृदयात घर करून राहील. लोकसभा निवडणुकीत सुद्धा अनेक कारणाने आपला लोकशाहीवरील दृढ विश्वास क्षणाक्षणाला दिसून आला. या लोकशाहीच्या खऱ्या योद्ध्याला नांदेड जिल्ह्यातील जनता शतशः नमन करते. प्रशासनातील आपली स्पष्टता, निर्णयक्षमता आणि संवेदनशीलता या गुणांनी जिल्ह्यातील नागरिकांना एक सक्षम आणि तळमळीचा अधिकारी दिला. आपल्या कार्यकाळात आपण शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण, कृषी विकास, आपत्ती व्यवस्थापन, निवडणुका या क्षेत्रात केलेले अमूल्य योगदान सदैव स्मरणात राहील. आपण केवळ प्रशासक नव्हे, तर नागरिकांच्या हक्कांचे संरक्षक, त्यांच्या समस्या जाणून आणि त्यावर त्वरित उपाययोजना करणारे आदर्श नेतृत्व म्हणून आमच्या मनात आपली प्रतिमा कायमच राहील. शिस्त, सेवा आणि सहकार्य यांचा त्रिवेणी संगम असलेल्या आपल्या कार्यशैलीमुळे आपण सर्वांची मने जिंकलीत. आपल्या कार्यकाळात अनेक नवोन्मेषी उपक्रमांद्वारे जिल्ह्याच्या प्रगतीला नव्या दिशा मिळाल्या. गरजूंना मदतीचा हात देताना, प्रशासन आणि जनतेतील नातेसंबंध अधिक मजबूत करताना, आपण कायम संवेदनशीलता आणि न्यायप्रियतेची चुणूक दाखवलीत.
आपण केवळ जिल्हाधिकारी नव्हे, तर या जिल्ह्याचे मार्गदर्शक, आश्वासक आणि आधारस्तंभ होतात. आपल्या हसऱ्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास, निर्णयक्षमतेतील स्पष्टता आणि लोकसंग्रहाचे कौशल्य यामुळे आपण प्रत्येकाच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. प्रशासनातील कठोरता आणि माणुसकीची ऊब यांचा समतोल राखणारे नेतृत्व लाभणे ही आम्हा नांदेड जिल्हावासियांसाठी गौरवाची बाब ठरली.
यापुढे आपण एका नव्या ठिकाणी व नव्या जबाबदारीला सामोरे जात असताना आमच्या मनी आपल्यासाठी सदैव सदिच्छा भाव आहे. आपण ज्या ठिकाणी जाल तिथे आपल्या विचार, कर्तव्य, कामाप्रतीची निष्ठा आणि सामान्य माणसांविषयी तळमळ यांमुळे सर्वपरिचित व सर्वप्रिय व्हाल हा विश्वास वाटतो. अशा भावना सबंध नांदेडकरांनी व्यक्त केल्या. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते पंजाबराब काळे, राजेश मोरे, डॉ. विठ्ठल पावडे, संतोष गव्हाणे, दशरथ कपाटे, सुभाष कोल्हे, संकेत पाटील, सुनील कदम, शिवाजी पावडे, राहुल धुमाळ, गणेश कपाटे, श्याम देवकांबळे, राज सरकार यांच्यासह ओझोन फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. संदीप काळे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी ओझोन फाउंडेशन समाजातील प्रत्येक घटकापर्यंत मदत करण्यासाठी अतिशय प्रयत्नशील काम करत असून अशा कामामुळे संस्थेचे समाजामध्ये आदराचे स्थान निर्माण झाले आहे गेल्या पाच वर्षापासून या फाउंडेशन मार्फत गौरव सोहळे होत आहेत ही बाब कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मा. अभिजीत राऊत यांनी केले.
प्रती,
मा. संपादक
दै………….
उपरोक्त बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रकाशित करून सहकार्य करावे ही नम्र विनंती.
प्रा. डॉ. संदीप काळे
अध्यक्ष, ओझोन फाउंडेशन, नांदेड.