स्नेहसंमेलन मंच ही कलावंतांची पंढरी -संचालक डॉ.सूर्यप्रकाश जाधव

नांदेड:(दि.२८ फेब्रुवारी २०२५)
यशवंत युवक महोत्सवातील विविध स्पर्धांमध्ये शारीरिक ऊर्जेबरोबरच भावनिक अविष्कार व्यक्त होत असतो. मन व बुद्धीचे प्रगटीकरण होत असते. समाजातील समस्यांची उकल करण्यासाठी नवसंशोधनाची संधी प्राप्त होत असते. स्नेहसंमेलन म्हणजे ही कलावंतांची पंढरी असते, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ.सूर्यप्रकाश जाधव यांनी केले.
यशवंत महाविद्यालयात युवक महोत्सव, रोजगार मेळावा आणि राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात दि. २८ फेब्रुवारी रोजी ते बोलत होते.
या प्रसंगी विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे कोषाध्यक्ष अँड. उदयराव निंबाळकर, माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, छत्रपती संभाजीनगर येथील उपायुक्त विद्या शितोळे, सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार, जिल्हा उद्योग केंद्र व्यवस्थापक श्री.अमोल इंगळे, युवक महोत्सव समन्वयक डॉ. एम. एम. व्ही. बेग यांची उपस्थिती होती.
अध्यक्षीय समारोपात अँड. उदयराव निंबाळकर म्हणाले की, जगामध्ये सर्वात जास्त तरुण भारतात आहेत. जीवनातील यशस्वीतेसाठी उत्कृष्ट नागरिक बनणे अत्यंत आवश्यक आहे. युवकांनी स्वावलंबन स्वीकारून स्वतःच्या पायावर उभे राहणे गरजेचे आहे. सर्वांना रोजगार मिळणे शक्य नाही; त्याकरीता युवावर्गाने स्वतः उद्योग उभारून यशस्वी उद्योजक व्हावे.
प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी, आधुनिक माणसाजवळ ज्ञान पुष्कळ असेल, मात्र कौशल्य नसतील तर स्वावलंबन प्राप्त होऊ शकणार नाही. युवक महोत्सव व रोजगार मेळावा एकत्रित आयोजनामागील हेतू शिक्षणक्षेत्रातील प्रत्येक उपक्रम रोजगार आणि स्वयंरोजगाराकडे जावा, हा आहे. आधुनिक जगामध्ये उत्क्रांती व विकास विज्ञानामुळे झाला आहे. दक्षिण कोरियामध्ये सर्वात जास्त कौशल्यधारक असल्यामुळे त्याआधारे ते जगावर राज्य करीत आहेत.
उपायुक्त विद्या शितोळे यांनी पुढील विचार व्यक्त केले, सदैव लक्षात ठेवले पाहिजे की, भाकरीसाठी पीठ व कंपन्यांसाठी कर्मचारी आवश्यक असतात. युवक महोत्सव आणि रोजगार मेळाव्याद्वारे युवकांना योग्य दिशा प्राप्त व्हावी. श्री. अमोल इंगळे म्हणाले की, ज्यांना रोजगार प्राप्त होत नाही, त्यांना उद्योग विभागामार्फत भांडवल उपलब्ध करून दिले जाते. भविष्यातील यशस्वी उद्योजक ज्ञान, प्रक्रिया आणि कौशल्य विकसित झाल्यानंतर निर्माण होतील. उपायुक्त रेणुका तम्मलवार यांनी, माणसाला जीवन जगण्यासाठी अन्न,वस्त्र, निवारा व विषयज्ञान असणे आवश्यक आहे. ज्ञान व कौशल्याने समाजाच्या गरजा पूर्ण होतात, असे प्रतिपादन केले.
प्रारंभी प्रास्ताविकात डॉ. एम. एम.व्ही.बेग म्हणाले की, विद्यार्थ्यांना आव्हाने आणि संधीची माहिती व्हावी यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांचा प्रवास हा शिक्षण ते व्यावसायिकता असा असावा.
सूत्रसंचालन डॉ.शिवाजी सूर्यवंशी यांनी केले तर आभार ग्रंथपाल डॉ.कैलास वडजे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ. हरिश्चंद्र पतंगे, प्रबंधक संदीप पाटील, विविध स्पर्धा समिती समन्वयक डॉ.विश्वाधार देशमुख, डॉ.नीरज पांडे, डॉ.अजय गव्हाणे, डॉ.संजय ननवरे, डॉ.नीताराणी जयस्वाल, डॉ.एल.व्ही.पदमारानी राव, डॉ.श्रीकांत जाधव, डॉ.मनोज पैंजणे, डॉ.प्रवीणकुमार मिरकुटे, समिती सदस्य डॉ.अजय मुठे, डॉ.धनराज भुरे, डॉ. साईनाथ बिंदगे, प्रा.प्रियंका सिसोदिया, डॉ.मोहम्मद आमेर, प्रा.शांतिलाल मावसकर, डॉ.शिवराज बोकडे, डॉ.दिगंबर भोसले, डॉ. मदन अंभोरे, डॉ.राजरत्न सोनटक्के, प्रा.भारती सुवर्णकार, डॉ.वनदेव बोरकर, डॉ.योगेश नकाते, प्रा.निलेश चव्हाण, डॉ. एन. एल. इंगळे, डॉ.मंगल कदम, डॉ.अंजली जाधव, डॉ. सविता वानखेडे, डॉ.रत्नमाला मस्के, प्रा.राजश्री भोपाळे, प्रा.एस.एस.वाकोडे, डॉ.साईनाथ शाहू, डॉ.एस.एम.दुर्राणी, प्रा.माधव दुधाटे, डॉ.रामराज गावंडे, डॉ. बालाजी भोसले, डॉ.कविता केंद्रे, प्रा. ए. आर. गुरुखुदे, डॉ.दीप्ती तोटावार, डॉ. शिवदास शिंदे, प्रा.संगीता चाटी, डॉ. मिरा फड, डॉ.संदीप पाईकराव, डॉ.डी.एस. कवळे, अधीक्षक कालिदास बीरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने यांनी सहकार्य केले.