मानवत कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डामध्ये जलकूंभ उभारा व्यापारी वर्गासह शेतकर्यांची मागणी.

*
मानवत // प्रतिनिधी.
मानवत कृषि उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातील लाखो रुपये खर्च करून शैचालय बांधले आहे. पण शैच्यालयाचा वापर न करता शेतकरी व्यापारी मात्र याचा वापर करीत नाही, लाखो रूपये खर्च करूण बांधलेले शैच्यालय ( संडास ) पडिक अवस्थे मध्ये आहेत ते पाडून या जागेवर पिण्याच्या पाण्याचे जल कूंभ उभारावे अशी मागणी तालूक्यातील शेतकर्यासह मानवत कृषि उत्पन्न बाजार समितीच्या यार्डातील व्यापारी वर्गातून जोर धरत आहे.
सविस्तर वृत्त असे की,
मानवत येथील मानवत कृषि उत्पन्न बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड परिसरात सुमारे 15 वर्षांपूर्वी मार्केट कमिटीच्या वतीने व्यापाऱ्यांना व शेतकऱ्यांना शौचालयाची व्यवस्था व्हावी म्हणून लाखो रुपये खर्च करून शौचालया चे बांधकाम केले. सध्या या शौचालयाची अवस्था अत्यंत खराब असून सध्या ते वापरा योग्य नसल्याने मार्केट यार्ड परिसरातील व्यापाऱ्यांना व शेतकऱ्यांना फार मोठी अडचण होत आहे. तसेच मार्केट यार्ड परिसरामध्ये शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने त्यांचे बेहाल होत आहे. या शौचालयाच्या समीप मार्केट कमिटीच्या वतीने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सावली व्हावी या हेतूने भव्य बांधकाम चालू आहे. या बांधकामा बरोबरच मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीने लाखो रुपये खर्चून बांधलेल्या शौचालयाला पाडून या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची जवळपास एक जल कूंभ उभारावे. जेणेकरून उन्हाळ्यामध्ये तसेच इतर हंगामात शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय होईल. मार्केट यार्ड परिसरातील अनेक व्यापाऱ्यांनी मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंकज भैय्या आंबेगावकर यांच्याकडे मागणी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावरून मार्केट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंकज भैय्या आंबेगावकर व संचालक मंडळांनी लाखो रुपये खर्चून बांधलेल्या शौचालयाच्या ठिकाणी एक जलकूंभ पिण्याच्या पाण्याची टाकी उभारून मार्केट यार्डात येणाऱ्या तालूक्यातील शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना पिण्याच्या पाण्याची सुलभ व्यवस्था होईल अशी मागणी तालूक्यातील शेतकर्यासह मानवत कृषि उत्पन्न बाजार समितीच्या यार्डातील व्यापारी वर्गातून जोर धरत आहे.
***