ताज्या घडामोडी

कर वसुली संदर्भात मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांनी घेतला आढावा.

मानवत / प्रतिनिधी.

मानवत नगर परिषदेचे आर्थिक वर्ष 2024- 25 संपत आलेले असून थकीत कर वसुलीसाठी वरिष्ठ कार्यलया कडून वारंवार कर वसुली संदर्भात बैठका घेण्यात येत आहेत. तर यामध्ये शासनाने दिलेले कर वसुलीचे उद्दिष्ट साध्य न झाल्यास शासन अनुदान बंद करण्याचे निर्देश वरिष्ठ पातळी वरून दिलेले आहेत. त्या अनुषंगाने आज दिनांक .05 फेब्रुवारी रोजी मानवत नगर परिषदेची कर वसुली संदर्भात महत्वाची आढावा बैठक मानवत नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती.
तर नगर परिषदेच्या मालकीची शाॅपिंग सेंटरची दुकान भाडे, घरपट्टी, पाणि पूरवठा विभागाची नळपट्टी इत्यादी विषयावर महत्वपूर्ण आढावा घेण्यात आला. दिनांक 28 जानेवारी रोजी ज्या पद्धतीने मानवत नगर परिषदेच्या कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांनी आक्रमक भूमिका घेऊन लाखो रूपयाचे गाळे भाडे थक बाकीदार यांच्या दुकानात सील ठोकले होते. त्याच प्रमाणे शहरातील वसुली रक्कम दहा हजार रुपयाच्या वरती कर थकबाकीदार यांच्यावर कुठलीही गय करण्यात येणार नाही असे निर्देश सर्व बिल कलेक्टर यांना मुख्याधिकारी यांच्या कडून सांगण्यात आले आहे.
मानवत शहरातील सर्व कर थकबाकीदार यांना यापूर्वी सूचना देवून दिनांक 15 फेब्रुवारी पर्यंत थकबाकी भरण्यासाठी सूचना दिलेली आहे.
मानवत नगर परिषदेच्या हद्दितील थकबाकीदार आपला कर भरणा करण्यास उदासीन दिसून येत आहेत, त्यामुळे नाईलाजास्तव नगर पालिका प्रशासनाला थकबाकीदार यांच्याकडे दहा हजार रुपये पेक्षा जास्त थकबाकी आहे अशा सर्व थकबाकीदारांची यादी निश्चित करण्यासाठी आजची महत्वाची बैठक घेण्यात आली. दिनांक 15 फेब्रुवारी रोजी मानवत शहरातील मुख्य ठिकाणी म्हणजेच बस स्टॅन्ड, मुख्य मार्केट, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मानवत नगर परिषद कार्यालय इत्यादी ठिकाणी ही यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिकांनी आपल्याकडे असलेले थकबाकी लवकरात लवकर मानवत नगर परिषद कार्यालयात भरून नगर परिषदेत सहकार्य करावे असे आवाहन मूख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांनी नागरिकांना केले आहे.
अन्यथा नागरिकांना नगर परिषदेच्या कार्यवाहीस सामोरे जावे लागेल. दिनांक 15 फेब्रुवारी नंतर थकबाकीदार यांच्या दारात ढोल ताशा वाजंत्री लावून वसुली करण्यात येईल.
तसेच शहरातील थकबाकीदार यांच्या पी.टी.आर. वरती शास्तीसह बोजा लावण्यात येईल. असे निर्देश मुख्याधिकारी कोमल सावरे यांनी दिले आहेत. मानवत नगर परिषदे कडून वसुलीसाठी विशेष उपाययोजना करण्यात आली. यामध्ये एकूण पाच पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. सदरील बैठकीस मानवत नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी या वेळी उपस्थित होते.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.