भगवान लक्ष्मी नारायण मंदीरामध्ये 65 वा ब्रह्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

मानवत // प्रतिनिधी.
——————————————
मानवत शहरातील मुख्यव्यापार पेठेतील मार्गावरील माहेश्वरी समाज यांचे वतीने 64 वर्षांपूर्वी मानवत शहरात भगवान लक्ष्मीनारायण मंदिराची उभारणी केली. मानवत शहरातील हे मंदिर तीन मजली असून भव्य व सुंदर आहे. या मंदिरामध्ये दरवर्षी मंदिर स्थापना दिवस म्हणून ब्रह्मोत्सव उत्साह मोठ्या ऊत्साहात साजरा करण्यात येतो. या निमित्ताने भगवान लक्ष्मीनारायण मंदिर मध्ये तीन दिवसीय होम हवनाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी ब्रह्मोत्सव दिनांक 5 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान साजरा होत आहे. या दरम्यान तीन दिवसीय होम हवनाचे
आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसात भगवान लक्ष्मीनारायण यांच्या मूर्तीचे अभिषेक व महाआरती करण्यात येत आहे. सात फेब्रुवारी रोजी समापन होणार असून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी ब्रह्मोत्सव साजरा करण्यासाठी होम हवनासाठी यजमानाची निवड करण्यात येते. यावर्षी होम हवनाचे व ब्रह्मोत्सव चे यजमान मानवत शहरातील दानशूर बद्रीप्रसादजी काबरा व कुटुंब यांच्या वतीने यजमानपद स्वीकारून धार्मिक कार्यास सहभागी आहे.
दिनांक पाच फेब्रुवारी रोजी येथील कटारी हनुमान मंदिर ते कटारे गल्ली मार्गे भगवान लक्ष्मीनारायण मंदिर पर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
यावेळी काढण्यात आलेल्या शोभायात्रेमध्ये माहेश्वरी समाजातील सर्व महिला व पुरुष तसेच ब्रह्मोत्सवाचे यजमान काबरा कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
***