सुमित शेल्हाळे यांची विद्यार्थी कल्याण मंडळाच्या सचिव पदी निवड

उदगीर :- येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील विद्यार्थी कल्याण मंडळाच्या सचिव पदासाठी नुकतीच निवडणुक घेण्यात आली. या निवड निवडणुकीत सर्व वर्ग प्रतिनिधी यांनी एकमताने बी.एसी.(कॉम्प्युटर सायन्स) तृतीय वर्षात शिकणारा सुमित शेल्हाळे या विद्यार्थ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सदरील निवड प्रक्रिया ही संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. सुधीर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या निवड समितीने केली आहे.
या निवडी बद्दल संस्थेच्या प्रशासकीय अधिकारी ज्योती स्वामी, उपप्राचार्य डॉ. शेषनारायण जाधव, विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रभारी प्रमुख प्रा. राहुल पूंडगे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. अमर तांदळे, संगणकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. राशिद दाईमी, प्रा. ऋतुजा डिग्रस्कर, प्रा. आकाश कांबळे, प्रा.असिफ दाईमी, प्रा. आवेज शेख, प्रा. नावेद मणियार, प्रा. नम्रता कुलकर्णी, प्रा. रोहिणी वाघमारे, प्रा. अनुजा चव्हाण, अमोल भाटकुळे, अपर्णा काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या निवड निवडणुकीत प्रिती जानके, क्षितिजा गुरुडे, वैष्णवी स्वामी, मरेवार पूजा, स्नेहा कोनाळे, शेल्हाळकर रणवीर, स्नेहा नागलगावे, शेख मुस्थखिम शरयू घोगरे या वर्ग प्रतिनिधीनी सहभाग घेतला.



