आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी शासन कटीबद्ध.. पालकमंत्री नामदार मेघना दीदी बोर्डीकर.

मानवत / अनिल चव्हाण.
—————————————
मानवत येथे देवगिरी कृषी फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड पाळोदीरोड मानवत येथे क्लिनिंग ग्रेडिंग युनिटचे उद्घाटन नामदार मेघना दीदी बोर्डीकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी केंद्रात व राज्यात भाजप सरकार असल्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी सबसिडीच्या माध्यमातून देशात व राज्यात वेगवेगळी मदत झाली आहे. वेगवेगळ्या योजना राबवल्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. शेतीशी निगडित अनेक योजनांचा लाभ घेऊन तरुणांनी उद्योग व्यवसायाकडे वळावे त्यासाठी बहीण म्हणून युवकांच्या मदतीसाठी मी सदैव तयार आहे.
केंद्र सरकारने नुकतेच देशातील शेतमालाच्या हमीभावात वाढ केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल असे त्यांनी यावेळी मार्गदर्शन करतांना म्हटले आहे. यावेळी *ह.भ.प. विदांताचार्य स्वामी शिवेंद्र चैतन्य महाराज* यशवाडी यांनी आपल्या जिल्ह्याला मेघना दीदी साकोरे यांच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याला पालकमंत्री पद मिळाल्यामुळे आपल्या जिल्ह्याचा कायापालट झाल्या शिवाय राहणार नाही. विकासाला निश्चितच चालना मिळणार असे त्यांनी म्हटले आहे.
या युनिट मुळे शेती क्षेत्रातील मालाला चांगला बाजार भाव मिळणार आहे. यावेळी *अनंत श्री 1008 विभूषित महामंडलेश्वर स्वामी मनीषानंद पुरीजी महाराज* अशोक नाना काकडे माजी. जि. प. सभापती प्रभाकर वाघीकर माजी उपाध्यक्ष जि. प. परभणी रंगनाथराव सोळंके किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस भाजपचे प्राचार्य अनंत गोलाईत, महेश कोकर,शिवाजीराव बोचरे, कृष्णा शिंदे, संचालक कृ.उ.बा.महादू कदम, अमोल कदम सरपंच हरिभाऊ निर्वळ तालुकाध्यक्ष भाजपा सुरेश होगे, मा.सरपंच माधवराव नाणेकर, तालुका अध्यक्ष मराठा सेवा संघ बी.के. होगे पाटील. नारायण होगे, उपसरपंच.आर बी नाईक मंडळ कृषी अधिकारी , भागवत होगे, कृष्णा होगे, माणिकराव काळे सरपंच, सुरज काकडे संचालक, कृ.ऊ.बा. या युनिटचे अध्यक्ष गोविंद शिंदे. उपाध्यक्ष गोविंद होगे, संचालक लक्ष्मण नानेकर . संचालक बालासाहेब काळे. संचालक बळीराम सूर्यवंशी, संचालक शिवाजी पुंड. संचालक विष्णू धोपटे, संचालक ज्ञानोबा शिंदे, तालुक्यातील शेतकरी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थित मान्यवरांचे आभार सदाशिवराव होगे पाटील यांनी मानले.
***



