अनुसूचित जमाती आयोगाची निर्मिती हा आदिवासी समाजाला दिशा देणारा निर्णय

मानवत / प्रतिनिधी.
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस सरकारने महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची निर्मिती करून आदिवासी समाजाला खरा न्याय मिळवून दिला.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आदिवासींना 75 वर्षानंतर न्याय मिळाला, काँग्रेस सरकारने आदिवासी समाजाला 75 वर्षा पर्यंत न्याय मिळवून दिला नाही. तो न्याय माननीय देवेंद्रजी फडणवीस सरकारने न्याय दिला सर्वांगीण विकासापासून दूर असलेल्या आदिवासी समाजाला खरा न्याय मिळाला आणि हा निर्णय आदिवासींसाठी ऐतिहासिक आहे.
त्यामुळे आदिवासी समाजाच्या विकासाला चालना मिळणार आहे आदिवासींवर आणि अत्याचार दूर होण्यास मदत मिळेल अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष *डॉ. पंडित मोरे* यांनी पत्रकारारांशी बोलतांना माहिती दिली. आजवर आयोगाकडून अनुसूचित जातीलाच न्याय दिला जात होता. अनुसूचित जमाती आयोगाने जमातीकडे दुर्लक्ष केले जात होते.परंतु आता अनुचित जमाती आयोगाची निर्मिती झाल्यामुळे आदिवासीना न्याय मिळेल. स्वतंत्र आदिवासी जमाती आयोगाची निर्मिती केल्यामुळे खऱ्या अर्थाने सोन्याचा दिवस उजाडला,ही मागणी गेल्या 50 वर्षापासूनची प्रलंबित होती.
परंतु ती केवळ घोषणापूर्तीच राहिली होती.मात्र आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल तोच निर्णय घेऊन मा. आदिवासी मंत्री डॉ. अशोक उईके आणि अनुसूचित जमाती आघाडीचे संघटनमंत्री ऍड. किशोरजी काळकर यांच्या प्रयत्नाला खरे यश आले.
हा निर्णय म्हणजे भाजप सरकारच्या सबका साथ सबका विकास या वचनाचा आदिवासी विकासासाठी, आदिवासी समाजासाठी,न्याय देणारा ठरला असे डॉ. पंडित मोरे यांनी सांगितले अनुसूच जमाती आयोगाची निर्मिती केल्यामुळे अनुसूच जमातीच्या प्रश्नांवर तातडीने प्रश्न सुटतील, प्रश्न सोडवले जातील.शिक्षण, रोजगार, आरोग्य,अन्न वस्त्र निवारा, जमीन, जल, जमीन इत्यादी प्रश्न तात्काळ सुटतील. केंद्र सरकार,राज्य सरकारच्या विविध शासकीय योजनांची प्रभावपने राबल्या जातील.या आयोगाला वैधानिक दर्जा देण्यात आला आहे. त्यात एक अध्यक्ष, चार प्रशासकीय सदस्य असणार आहेत. आयोगाच्या कार्यासाठी 26 पदाची निर्मिती, कार्यालयीन जागा,कर्मचारी आणि आवश्यक सुविधा आणि यंत्रणा उभारण्यासाठी सुमारे *चार कोटी वीस लाख रुपयांची* तरतूद करण्यात आली आहे.
परभणी जिल्हाअध्यक्ष,श्री.घुंबरे सुरेश, प्रदेश प्रवक्ते डॉ. उमेश देशमुख, प्राचार्य श्री.अनंत गोलाईत, डॉ. सुभाष कदम इत्यादी उपस्थित होते.
***