ताज्या घडामोडी

कलावंतांना कुठलीही जात किंवा धर्म नसतो – डॉ. एम.डी.इंगोले

नांदेड:( दि. ८ डिसेंबर २०२४)
परिवर्तनवादी कलावंत हा केवळ प्रबोधनासाठी आपली कला सादर करत असतो. कलावंताला कुठलीही जात किंवा धर्म नसतो, असे प्रतिपादन गंगाखेड येथील संत जनाबाई महाविद्यालयातील हिंदी विभागप्रमुख डॉ. एम. डी.इंगोले यांनी केले.
श्री. शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार दि. ६ डिसेंबर रोजी आयोजित यशवंत प्रबोधन व्याख्यानमालेत ‘आंबेडकरी जलसाकारांची समाज प्रबोधनातील भूमिका’ या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.
पुढे बोलताना डॉ. एम.डी. इंगोले म्हणाले की, कलावंताची कलावंत हीच जात आणि कलेची उपासना हाच त्यांचा धर्म असतो. नंतर त्यांनी, आंबेडकरी जलसाकारांनी लोकमनोरंजन आणि समाजप्रबोधनासाठी केलेल्या कार्याचा आढावा घेतला तसेच आंबेडकरी आंदोलनासाठी जलसाकारांनी दिलेले योगदान आणि शासनाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसार कशा पद्धतीने केला, यावरही त्यांनी प्रकाश टाकला. प्रामुख्याने शाहीर अर्जुन कदम, शाहीर कैलास राऊत, शाहीर बापूराव जमदाडे, शाहीर गौतम पानपट्टे, शाहीर रमेश गिरी, शाहीर क्रांतीकुमार पंडित, शाहीर आनंद कीर्तने, शाहीर ललकार बाबू, शाहीर विठ्ठल जोंधळे, शाहीर गौतम सरवदे, शाहीर गोपाळ इंगळे, शाहीर सुभाष गवळी इत्यादींच्या योगदानावर प्रकाश टाकला.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक थोर अर्थशास्त्रज्ञ व समाजसुधारक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य व विचारांची प्रेरणा घेऊन महाविद्यालयीन युवक घडला पाहिजे; असे मत व्यक्त केले.
प्रारंभी प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. संदीप पाईकराव यांनी केले तर आभार डॉ.राजरत्न सोनटक्के यांनी मानले.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. हरिश्चंद्र पतंगे, समिती सदस्य डॉ. गौतम दुथडे, डॉ.मीरा फड, डॉ.ज्ञानेश्वर पुपलवाड, ग्रंथपाल डॉ. कैलास वडजे, डॉ. राजरत्न सोनटक्के, प्रा. एस.एस.मावसकर, डॉ.साईनाथ शाहू, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका डॉ. एल. व्हि. पद्माराणी राव, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, डॉ.शिवाजी सूर्यवंशी, डॉ. कैलास इंगोले, डॉ. रत्नमाला मस्के, डॉ. प्रवीण मिरकुटे, डॉ.अजय मुठे, डॉ. संजय नंनवरे, डॉ. रमेश चील्लावार, डॉ. निलेश चव्हाण, डॉ. संभाजी वर्ताळे, डॉ. संजय जगताप, डॉ.अजय गव्हाणे, डॉ. रामराज गावंडे, डॉ. शिवराज शिरसाठ, डॉ. संदीप खानसोळे, डॉ. डी.डी.भोसले, डॉ. एस.एम. दुर्राणी, प्रा. भारती सुवर्णकार, डॉ. दीप्ती तोटावार, प्रा. राजश्री भोपाळे, डॉ. एकनाथ मिरकुटे आदी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.