ताज्या घडामोडी

इंद्रायणी देवीच्या दर्शनासाठी भक्तांची मायंदळी

देवीच्या दर्शनासाठी लाखो भक्तांचा जनसागर लोटला.

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालुक्यातील लोहरा भोसा जगमवाडी शिवारात असलेले इंद्रायणी देवी ची यात्रेचा आजची चौथी माळ असल्याकारणाने व आज दिनांक 6 ऑक्टोंबर 2024 वार रविवार असल्याकारणाने पंचक्रोशीतील भक्तांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या त्याचे कारणही तसेच आहे रविवार असल्याकारणाने व्यापारी व नोकरदार वर्ग व सुट्टीचा वार असल्याने इंद्रायणी माळ येथे तुफान गर्दी पाहावयास मिळाली इंद्रायणी माळ येथे जाण्यासाठी बहुतेक वाहतूक ही पाळोदी मार्गे मांडाखळी येथून देवीच्या दर्शनाला जातात त्यामुळे सकाळपासूनच दर्शनाला जाण्यासाठी वाहनांच्या रांगाच रांगा पहावयास मिळाल्या. दरवर्षीप्रमाणे नवरात्र मध्ये चाललेले ह्या उत्सवात परिसरातील भक्त मंडळी दर्शनासाठी हमेशा येत असतात प्रशासन सुद्धा यात्रेसाठी बसस्थानाकातून प्रवासासाठी एसटी महामंडळ इंद्रायणी देवीच्या दर्शनासाठी स्पेशल एसटी बसेस सोडल्या जातात,तसेच खाजगी वाहतूकऑटो, व मोटरसायकल व इतर वाहनाने भक्त मंडळी दर्शनाला येत असतात एसटी महामंडळाच्या बसेसची सुविधा व स्वस्त प्रवास उपलब्ध झाल्यामुळे महिला व वयस्कर मंडळी साठी विशेष सुविधा उपलब्ध झाल्यामुळे तळागाळातील जनतेला तिथपर्यंत पोहोचण्यास मार्ग सोपा झाला आहे. इंद्रायणी माळावर जाण्यासाठी मजबूत रस्ता व डांबरीकरण झाल्यामुळे वाहनांना देवीच्या मंदिरापर्यंत जाण्यास रस्त्याची सुविधा उपलब्ध झाली आहे या ठिकाणी लोहरा भोसा येथील गावकऱ्यांकडून येथे रोज भजन कीर्तन व अन्नदान मोठ्या प्रमाणात होत आहे त्याकामी भोसा येथील दत्ताराव जाधवं (मार्केट कमिटी संचालक मानवत) व गावकरी मंडळी व गावातील पाटील प्रधान ताई लक्ष ठेऊन रोज असतात सदरील इंद्रायणी देवी माळ मंदिर ठिकाण मानवत पोलीस स्टेशन अंतर्गत येत असल्याकारणाने मानवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांनी मोठ्या प्रमाणात होमगार्ड व पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता त्यांच्या पोलीस बंदोबस्तमुळे असलेल्या देवी मंदिर यात्रेमध्ये आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा चेन कॅचिंग पिक पॉकेटिंग या घटनाअनुचित प्रकार घडला नाहीं व अशा प्रकारच्या घटनाना आळा बसला आहे विशेष करून दरवर्षी सातवी माळ ला इंद्रायणी देवी येथे अति प्रमाणात भक्तांची गर्दी पहावयास मिळते या ठिकाणी तेथे कुस्त्याचे फड व इतर बच्चे कंपनीसाठी खेळाचे साहित्य राट पाळणे उंच उडी मारणे घसरगुंडी सारखे बच्चे कंपनीचे मनोरंजनाचे साहित्य उपलब्ध झाले आहे.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.