ताज्या घडामोडी

मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे, यांच्या मार्गदर्शनाखाले मानवी साखळीचे आयोजन

मानवत / प्रतिनिधी.

*स्वभाव स्वच्छता , संस्कार स्वच्छता अभियानार्गत मानवत नगर पालिकेच्या वतीने मानवी साखळीचे आयोजन. स्वच्छता ही सेवा 2024
अर्तगत मानवत नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांच्या मार्गदर्शनाखाले नेताजी सुभाष विद्यालया मध्ये दैनंदिन विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता या अंतर्गत आज दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी विद्यालय मध्ये मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले या वेळी मानवत नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती कोमल कोल्हे, सावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापासून स्वच्छता ही सेवा अभियानास सुरुवात करण्यात आली आहे. 18 सप्टेंबर रोजी सफाई मित्र सुरक्षा शिबिर ,19 सप्टेंबर रोजी एक दिवस श्रमदानासाठी, 20 सप्टेंबर रोजी कचऱ्याची विल्हेवाट लावणे, 21 सप्टेंबर रोजी सांस्कृतिक कार्यक्रम, 22 सप्टेंबर रोजी एकल प्लास्टिक न वापरणे, 23 सप्टेंबर रोजी एक झाड आईच्या नावे,आणि आज 24 सप्टेंबर रोजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करून स्वच्छता संदेश दिला आहे.यावेळी नगरपरिषद मानवत मुख्याधिकारी श्रीमती कोमल कोल्हे सावरे ,मुख्याध्यापक श्री संजय लाड ,श्री यू. टी.हारकळ सर ,श्री व्ही.पी.बुधवंत सर, श्री अशोक काळे सर, श्री प्रा. रणवीर सर आदींची उपस्थिती होती .मानवी साखळी तयार करण्यामध्ये कलाशिक्षक श्री कौसाईतकर सर यांनी कौशल्यपूर्ण अशी स्वच्छ मानवत सुंदर मानवत नावाची मानवी साखळी तयार करून स्वच्छतेचा संदेश दिला. या वेळी क्रीडा शिक्षक संजय जाधव सर,परीक्षा विभाग प्रमुख अशोक हरकळ सर,सांस्कृतिक विभाग केशव बाभळे सर,बाजीराव सावंत सर,सखाराम नाईक सर सर्व महिला शिक्षिका व कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
सर्वांचे आभार

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.