ताज्या घडामोडी

यशवंत ‘ मध्ये हिंदी पंधरवडा उत्साहात संपन्न

नांदेड:( दि.२७ सप्टेंबर २०२४)
श्री. शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयाच्या हिंदी विभागाद्वारे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र- कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार दि.१४ ते २६ सप्टेंबर दरम्यान हिंदी पंधरवडा आयोजित करण्यात आला होता.
या पंधरवड्यानिमित्ताने निबंध स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा, शुद्धलेखन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
हिंदी पंधरवड्याचा समारोप सरस्वती विद्यामंदिर कला महाविद्यालय, किनवटच्या हिंदी विभागाचे प्रा. तपनकुमार मिश्रा यांच्या विशेष व्याख्यानाने करण्यात आला. याप्रसंगी हिंदी अभ्यास मंडळाचे उद्घाटनदेखील करण्यात आले.
सर्वप्रथम बी.ए.,बी.कॉम आणि बी.एससी. च्या विद्यार्थ्यांच्या कवितांचा संकलन असलेले डॉ. सुनील जाधव द्वारा निर्मित ‘तरंग’ भित्तिपत्रकाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात वैष्णवी मंदेवाड, कोमल कागदेवाड आणि पुनम अंभोरे यांच्या स्वागत गीताने करण्यात आली. प्रास्ताविक विभागप्रमुख डॉ. संदीप पाईकराव यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. सुनील जाधव यांनी केला तर आभार डॉ. साईनाथ साहू यांनी मानले.
विशेष व्याख्यानात बोलताना प्रा. तपनकुमार मिश्रा म्हणाले की, मातृभाषा ही हृदय,कल्पना आणि विचारांची भाषा असते. भारतासारख्या विशाल आणि बहुभाषिक देशांमध्ये भिन्न भिन्न भाषीक लोकांमध्ये सामंजस्याची भावना असणे अत्यंत आवश्यक आहे; कारण इतर भेदांपेक्षा भाषाभेद ही अत्यंत घातक बाब ठरू शकते. मातृभाषेसोबतच राष्ट्रभाषा म्हणून हिंदीचा सर्व भारतीयांनी केवळ सन्मानच नव्हे तर स्वीकार करून हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. हिंदी भाषा केवळ संपर्क भाषा नसून देशाच्या स्वाभिमानाची आणि आत्मसन्मानाची भाषा आहे.
अध्यक्षीय समारोपात उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे यांनी, हिंदी विभागाद्वारे आयोजित विभिन्न उपक्रमाचे कौतुक करीत अटल बिहारी वाजपेयी यांची कविता सादर करून सर्व उपस्थितांची मने जिंकली.
याप्रसंगी डॉ. सुनील जाधव, डॉ. विद्या सावते, डॉ. साईनाथ साहू व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे, जगदीश उमरीकर, नाना शिंदे आदींनी सहकार्य केले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.