ताज्या घडामोडी

गावकूसातील ओबिसी समाजाला सकल मराठा समाज सांभाळतो

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालूक्यातील मौजे नागरजवळा गावाचे आराध्य दैवत हनूमान मंदिराचे पूजारी हे ओबीसी माळी समाजाचे असून जिल्हातील ओबीसी समाजाला आज ही सकल मराठा समाज जिवापाड जपतो असल्याचे उदाहरण नागरजवळा येथील गाव गाड्यातील ओबीसी बांधव अर्जुनराव रासवे यांना सर्पदंश झाल्यामूळे परभणी येथे स्पंदन हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलेले आहे. त्यांची परिस्थिती बेताची असल्याने सकल मराठा समाज नागरजवळा यांच्या वतीने सामाजिक बांधीलकी म्हणून आज सकाळी एका तासात 52790 रूपये एवढी वर्गणी जमा करून दखावान्या करिता मदत निधी संकलन करून देण्यात आला. आणखीणही वर्गणी जमा करणे चालूच आहे जवळपास 100000 रूपयां पेक्षाही जास्त वर्गणी जमा व्हायची शक्यता आहे.
तसेच दवाखान्यात करिता एक लाख रूपयां पेक्षाही जास्त रक्कम लागली तरीही सकल मराठा समाज नागरजवळा यांच्याकडून देण्याची तयारी आहे.
त्यामूळे सकल मराठा समाजाने १२ बलूतेदार ओबीसी समाजाला सकल मराठा समाजाने गावकूसात जिवापाड जपतो असल्याचे पाहावयास मिळत आहे.
तर राजकारणी आपली पोळी भाजण्यासाठी समाजा समाजाचा वापर करीत असल्याने राजकारण्या विषयी चिंता व्यक्त केल्या जात आहे.

*

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.