ताज्या घडामोडी

आधुनिकीकरणामुळे संशोधनाची गती, दर्जा आणि वास्तवाची सिद्धता: श्री.रणजीत धर्मापुरीकर. माहितीशास्त्रज्ञ

नांदेड:( दि.३१ ऑगस्ट २०२४)
आधुनिक काळ हा प्रत्येक बाबीसाठी माहिती तंत्रज्ञानाचे सहाय्य घेण्याचा काळ आहे. संशोधकाचे विचार संशोधनाला दर्जेदार बनवीत असतात. आधुनिकीकरणामुळे संशोधनाची गती, दर्जा आणि वास्तव सिद्ध झालेले आहे. माहिती तंत्रज्ञानाची मैत्री केल्यानंतर विश्वासार्ह व दर्जेदार संशोधन होत असते. संशोधकाच्या नावाने संशोधन ओळखले जावे, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील सेवानिवृत्त माहितीशास्त्रज्ञ श्री.रणजीत धर्मापुरीकर यांनी केले.
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात ग्रंथालय सल्लागार समिती आणि संशोधन प्रोत्साहन व नाविन्यपूर्ण निष्कर्ष समितीच्या वतीने आयोजित ‘संशोधनाचे बदलते स्वरूप’ या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेत ते बोलत होते.
याप्रसंगी विचारमंचावर माजी प्र- कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य व कार्यशाळेचे निमंत्रक डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, संघटक सचिव ग्रंथपाल डॉ.कैलास वडजे, सहसंघटक सचिव डॉ.संजय ननवरे आणि डॉ.एम.एम.व्ही. बेग यांची उपस्थिती होती.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांनी, संशोधनामध्ये ग्रंथालयाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असते. संशोधकाने स्वतःच्या कौशल्यानुसार लेखन करावे. स्वतःचे मत लिहावे. संशोधन कार्यास विशिष्ट दर्जा असावयास हवा. वाङ्मय शौर्य ही संशोधनातील अत्यंत वाईट बाब आहे. संशोधनाचे निष्कर्ष आणि उपयुक्तता याचा प्रत्येक वेळी उल्लेख व्हावा, असे मत व्यक्त केले.
प्रारंभी प्रास्ताविक डॉ.संजय ननवरे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एम.एम.व्ही.बेग यांनी केले. प्रमुख अतिथींचा परिचय डॉ.कैलास वडजे यांनी करून दिला आणि शेवटी आभार प्रा.भारती सुवर्णकार यांनी मानले.
शेवटी प्रश्नोत्तर आणि चर्चासत्रात डॉ.एल.व्ही.पद्माराणी राव, डॉ.अजय टेंगसे, डॉ.शिवराज शिरसाठ व संशोधक विद्यार्थिनी पूजा कदम यांनी सहभाग घेतला.
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डॉ.भरत कांबळे, डॉ.प्रवीणकुमार मिरकुटे, प्रा.एन.बी.चव्हाण, प्रा.साहेब माने, डॉ. संभाजी वर्ताळे, डॉ.विजय भोसले, डॉ. मदन अंभोरे, प्रा.पी.आर.चिकटे, प्रा. अर्जुन गुरखुदे, डॉ.योगेश नकाते, डॉ. एस. एस.राठोड, डॉ. ए.एस.कुवर, प्रा. नारायण गव्हाणे, प्रा.एस.बी.राऊत आदींनी परिश्रम घेतले तसेच डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, संजय भोळे, जगन्नाथ महामुने यांनी सहकार्य केले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.