ताज्या घडामोडी

अखेर काॅम्रेड लिंबाजी कचरे पाटील यांच्या आंदोलनामूळे ईरळद गावाचा वीज प्रश्न मिटला

मानवत / प्रतिनिधी.

महावितरणने घेतला काॅम्रेडच्या आंदोलनाच्या धसक्का एकाच दणक्याने *अभियंता, मोहमंद तल्ला* यांनी केली कर्मचाऱ्यांची नियुक्ती गेल्या एक महिन्यापासून कमी दाबाने होणारा तालुक्यातील ईरळद गावातील वीजपुरवठा ग्रामस्थांनी महावितरणच्या कार्यालयात गुरूवारी केलेल्या दोन तासांच्या ठिय्या आंदोलना नंतर सुरळीत होणार असल्याचे सांगितले. तसेच यावेळी महावितरणने तात्काळ एका कर्मचाऱ्याची नियुक्ती केल्याचे आदेश दिले.
मानवत तालुक्यातील ईरळद येथे गेल्या महिना भरापासून कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने ग्राम पंचायतीचा पाणीपुरवठ्यासह अन्य कामे ठप्प पडली होती. कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने गावातील अनेक गोर गरीब नागरिकांची वीज उपकरणे जळाली होती. या त्रासाला ग्रामस्थ कंटाळून गेले होते.
अखेर सोमवारी ग्रामस्थांनी ईरळदचा वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा, गुरुवारी महावितरणच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला होता. परंतु अधिकारी वर्गाने याची दखल घेतली नाही. त्यामुळे ईरळद येथील संतप्त
ग्रामस्थांनी काॅम्रेड, लिंबाजी कचरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी (दि.२९) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मानवत शहरातील वीज महावितरणच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनाची तात्काळ दखल घेत ग्रामीण *अभियंता मोहम्मद तल्ला* यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देत बी. आर. कदम या तंत्रज्ञ कर्मचार्‍याची नियुक्ती करीत असल्याचे पत्र आंदोलनकर्त्ते नागरिकांना दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.
यावेळी काॅम्रेड लिंबाजी कचरे पाटील यांच्या सह आंदोलनात ईरळद ग्राम पंचायतीचे सरपंच अशोक कचरे, रमेश साठे, संजय देशमुख, शेख गुलाब, संदीप मुळे, प्रभाकर बारहाते, पांडुरंग खरात, एकनाथ मोगरे, शेख लालू, सुखदेव मोगरे, नारायण मुळे, एकनाथ बारहाते, विठ्ठल मुळे, सचिन खरात, राजेभाऊ मुळे, माऊली मुळे, गंगाधर खरात, वैभव महाजन, नरेश घनसावंत, दादाराव गायकवाड, आबा डोळे, कैलास मुळे, शिवाजी मुळे, दत्ता मुळे, लखन मुळे, बाबाराव आळणे, रामप्रसाद खरात, मदन गायकवाड, रमेश खरात, उत्तम दुधे आदीसह ईरळद येथील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.