ताज्या घडामोडी

नेताजी सुभाष विद्यालया मध्ये *हाॅकी के जादूगार, मेजर ध्यानचंद यांची जयंती “राष्ट्रिय क्रिडा दिन म्हणून साजरी

मानवत / प्रतिनिधी.

मानवत येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मानवत येथे आज दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त “राष्ट्रीय क्रीडा दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे उप मुख्याध्यापक आदरणिय श्री.उद्धवराव हरकाळ सर तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री अशोक काळे सर पर्यवेक्षक श्री व्ही.पी.बुधवंत सर,क्रिडा शिक्षक माणिकराव शिसोदे,क्रिडा शिक्षक श्री.संजय जाधव सर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरूवातीला सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून पूष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर इयत्ता 9 वी (ड)या वर्गातील कु.आनंदी अनिल बोरबने या विद्यार्थिींनी ने मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर उत्कृष्ट भाषण केले तसेच श्री बुधवंत सर यांनी क्रिडा दिना विषयी,व अनेक खेळा बद्दल माहिती सांगून कोणत्याही खेळामुळे आपल्या जीवना मध्ये माणसाच्या अंगी जिद्द,चिकाटी,निर्माण होते तसेच आपले अरोग्य सुदृढ राहते,सांघिक वृती निर्माण होते, आणि कोणत्याही विद्यार्थ्याला खेळामध्ये सहभाग घेता येतो असे सांगून मेजर ध्यानचंद यांनी आपल्या देशासाठी कठोर परिश्रम घेऊन अनेक सुव र्ण पदके मिळून दिले व त्यांनी देशाचे नाव जगामध्ये उज्ज्वल केले असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोपात श्री.उद्धवराव हरकाळ सर यांनी जीवनामध्ये शालेय शिक्षणा बरोबरच खेळाला खूप महत्त्व आहे प्रत्येक विद्यार्थ्याने खेळात सहभागी झाले पाहिजे असे सांगून मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त सर्वांना सुभेच्छा दिल्या. या प्रसंगी कार्यक्रर्माचे सुत्र संचलन सौ कुसूमताई कनकुटे यांनी केले तर सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार श्री.केशवराव बाभळे यांनी मानले
कार्येक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.