ताज्या घडामोडी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ म्हणजे माता-भगिनींप्रती कृतज्ञता!

*नांदेड :* अल्पावधीतच महिलांच्या पसंतीस उतरलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजनेअंतर्गत ‘लाडक्या बहिणीचा देवाभाऊ’ (रक्षाबंधन) महिला मेळावा शहरातील कौठा भागातील मातोश्री मंगल कार्यालय येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ऑनलाइनद्वारे पार पडला.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या महिला मेळाव्याची नांदेड जिल्ह्याची जबाबदारी माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, महिला आघाडीच्या श्रद्धा चव्हाण व प्रणिताताई देवरे-चिखलीकर यांच्यावर सोपवण्यात आली होती.

यावेळी मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आशिष शेलार, विधान परिषदेचे सदस्य प्रवीण दरेकर, विजयाताई रहाटकर, महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ आदींची ऑनलाइन द्वारे उपस्थिती होती तर नांदेड येथून भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, राज्यसभा खासदार डॉ.अजित गोपछडे, किनवट विधानसभेचे आमदार भीमराव केराम, भाजपा नांदेड दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे, महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, भाजपा उत्तर ग्रामीण जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, माजी महानगराध्यक्ष प्रविण साले, डॉ.शितलताई भालके, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष संध्याताई राठोड पुनमताई पवार, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य मिलिंद देशमुख, बालाजीराव बच्चेवार, जनार्दन ठाकूर नंदकुमार कुलकर्णी, श्रावण पाटील भिलवंडे, बाळू खोमणे, आघाडीचे डॉक्टर सचिन उमरेकर, भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणराव ठक्करवाड, भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस डॉक्टर माधवराव उच्चेकर, भारतीय जनता पार्टी लोहा विधानसभा प्रमुख तथा जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर, भाजपा युवा मोर्चा महानगराध्यक्ष बंटी मल्होत्रा, माजी महिला मोर्चा महानगराध्यक्ष वैशालीताई देशमुख, महानगर सरचिटणीस विजय गंभीरे, सरचिटणीस अमोल कदम, युवा मोर्चा प्रदेश सचिव अनिल बोरगावकर, मंडळाध्यक्ष मारुती वाघ, सुरेश लोट, जसबीरसिंघ धुपीया, महादेवी मठपती, पुनमकौर धुपिया, हिरामण देशमुख, अशोक पाटील धनेगावकर, व्यंकटेश जिंदम विजयाताई घिसेवाड मनोज जाधव व इतर मान्यवर आणि आमच्या लाडक्या बहिणी उपस्थित होत्या.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची औपचारिक सुरुवात आज झाली असली तरी रक्षाबंधनाच्या आधीच महाराष्ट्रातील माझ्या 1 कोटी 3 लाख लाडक्या बहिणींना ओवाळणी म्हणून खात्यात ₹3000 जमा झाले आहेत कारण आपले सरकार लेना बँक सरकार नसून देना बँक सरकार आहे.

31 जुलैपर्यंत आलेल्या फॉर्म्सचेच हे पैसे असून 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरणाऱ्या बहिणींच्या खात्यातही तब्बल 3 महिन्यांची रक्कम जमा होणार जमा होणार आहे. ही खटाखट योजना नसून फटाफट योजना आहे. आम्ही ही योजना आणली तेव्हा सावत्र भावांनी ठरवलं की बहिणींना ओवाळणी मिळूच द्यायची नाही. त्यासाठी ते आधी कोर्टात गेले, कोर्टाने फटकारल्यानंतर पुरुषांचे फोटो लावून फॉर्म भरले. फॉर्म्ससाठीचे पोर्टल बंद पडले पाहिजे म्हणून जंक डेटा टाकला मात्र आमच्या बहिणींना पैसे देण्याचा निर्धार आम्ही पूर्ण केला. आमच्या माता-भगिनींप्रती आमची ही कृतज्ञता आहे. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले त्यांना ₹1500 मोल समजू शकत नाहीत, असे देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना म्हणाले.

केंद्र सरकारच्या पाठिंब्याने आम्ही महिला केंद्रीत योजना सुरु केल्या. लेक लाडकी योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण, मुद्रा योजनेमार्फत ६३% महिलांना कर्ज, महिला बचत गटाच्या माध्यमातून ६३ लाख महिलांना काम मिळाले. आम्ही आमच्या माता-भगिनींच्या पाठिशी कायम उभे आहोत, हा शब्द याठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.