ताज्या घडामोडी

क्रिडा, मॅरेथान, वाचन,रंगभर, अशा विविध स्पार्धानी *सरदार वल्लभभाई पटेल विद्यामंदीर* मध्ये ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालूक्यातील मानोली येथील सरदार वल्लभभाई पटेल विद्यामंदिर मध्ये देशाचा ७८ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.डी.एन.जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
नंतर विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीत गायन, नाटक,व समुह नृत्य सादर केले. अतिशय उत्स्फूर्तपणे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी ‌मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांच्या हस्ते MTS स्पर्धेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
परभणी येथे झालेल्या अक्षर आनंद बाल वाचक साहित्य संमेलनामध्ये उत्कृष्ट बालवाचक म्हणून भक्ती विष्णू काकडे प्रथम क्रमांक पटकावला.
अंजली अवधूत शिंदे व श्रावणी राजेंद्र सुरवसे… द्वितीय क्रमांक पटकावला.
प्रतिक्षा शिंदे हीने तृतीय क्रमांक पटकावला या विद्यार्थ्यीनीचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
तिनं दिवस हर घर तिरंगा उपक्रम निमित्ताने शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थी सहभागी झाले.
या प्रसंगी देशप्रेमी नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.