ताज्या घडामोडी

जीवनाचे प्रतिबिंब म्हणजे साहित्यरत्न अण्णाभाऊंचे साहित्य – डॉ.प्रल्हाद भोपे

नांदेड:( दि.१ ऑगस्ट २०२४)
अण्णाभाऊंचे साहित्य हे जगण्याचे विविध रूपे घेऊन जन्माला आले आहे. जगातील २२ भाषांमध्ये त्यांचे साहित्य भाषांतरित झाले असून दीड दिवसाची शाळा शिकणाऱ्या या महान लेखकाचे कर्तृत्व या बाबींनी अधोरेखित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा समर्थ वारसा अण्णाभाऊंनी पुढे नेला. जीवनाचे प्रतिबिंब म्हणजे लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य आहे, असे प्रतिपादन श्री. शिवाजी महाविद्यालय, परभणी येथील मराठी विभागप्रमुख डॉ.प्रल्हाद भोपे यांनी केले.
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात यशवंत प्रबोधन व्याख्यानमालेत ते बोलत होते.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार ‘साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचे विचार व कार्य’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विचारमंचावर प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे, उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे आणि व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. संदीप पाईकराव यांची उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
पुढे डॉ. प्रल्हाद भोपे यांनी, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचार व कार्याचा आढावा घेत म्हणाले की, शाहिरी, लावण्या, पोवाडे, कादंबऱ्या, कथासंग्रह व प्रवास वर्णनासारखे सुंदर साहित्य अण्णाभाऊंनी निर्माण केले. साम्यवादी विचारांच्या प्रभावाची छाप त्यांच्या साहित्यात दिसून येते. अण्णाभाऊंच्या साहित्यातील पात्रे ही रोजच्या जगण्यातील पात्रे असल्यामुळे ती जिवंत, लोकप्रिय व वाचकप्रिय झाली.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे म्हणाले की, प्रबोधन व्याख्यानमालेतून महापुरुषांच्या विचारांचा जागर या निमित्ताने करता येतो. आधुनिक पिढीला या महापुरुषांची चरित्र व कार्य समजावे, हा हेतू या व्याख्यानमालेचा आहे. महापुरुषांच्या विचारांची प्रेरणा घेऊन महाविद्यालयीन युवक घडला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
सूत्रसंचालन डॉ. संदीप पाईकराव यांनी केले तर आभार डॉ. ज्ञानेश्वर पुपलवाड यांनी मानले.
याप्रसंगी व्याख्यानमाला समितीचे सदस्य डॉ.गौतम दुथडे, डॉ.मिरा फड, डॉ.ज्ञानेश्वर पुपलवाड, ग्रंथपाल डॉ.कैलास वडजे, डॉ. राजरत्न सोनटक्के, प्रा.एस.एस.मावसकर, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका डॉ.एल. व्ही. पदमारानी राव, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, डॉ.शिवराज बोकडे, डॉ.कैलास इंगोले, डॉ.रत्नमाला मस्के, डॉ. व्ही.सी. बोरकर, डॉ. प्रवीण मिरकुटे डॉ. रमेश चिल्लावार, डॉ. निलेश चव्हाण, डॉ. संभाजी वर्ताळे, डॉ.संजय जगताप, डॉ.साईनाथ शाहू, प्रा.के.जी.गायकवाड, परशुराम जाधव, डॉ.अजय गव्हाणे आदी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.