विद्यार्थ्यांचा सर्वांगीण सामाजिक विकास हा समाजशास्त्रातूनच होतो : डॉ .बाबुराव जाधव
नांदेड: प्रतिनिधी
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण सामाजिक विकास घडवून आणण्यासाठी समाजशास्त्र हा विषय महत्त्वाचा असतो आणि विद्यार्थ्यांनी समाजशास्त्र या विषयाचा अभ्यास याच दृष्टिकोनातून करावा असे मत डॉ. बाबुरावजी जाधव यांनी विद्यार्थ्यांसमोर मार्गदर्शन करताना मांडले.
यशवंत महाविद्यालयाच्या पदवी आणि पदव्युत्तर समाजशास्त्र विषयासाठी इंडक्शन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून डॉ. बाबुराव जाधव बोलत होते. महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाने नव्याने पदवी व पदव्युत्तर समाजशास्त्र विषयासाठी प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम आयोजित केला होता. या कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून डॉ. जाधव बोलत होते.
शैक्षणिक वर्ष 2024 -25 या वर्षासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार प्रवेशित झालेल्या पदवी आणि पदव्युत्तर वर्गातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना समाजशास्त्राची उपयोगिता या शीर्षकांतर्गत एका व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते .या व्याख्यानात मार्गदर्शक म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील सामाजिक शास्त्र संकुलातील समाजशास्त्र विषयाचे विभाग प्रमुख डॉ. बाबुरावजी जाधव उपस्थित राहिले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. समाजशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. भरत कांबळे आणि या विभागातील प्राध्यापक डॉ.बी आर भोसले त्याचप्रमाणे या विभागातील प्रा .शंकर मार्कड आणि प्रा. पूजा मिरगेवार हे ही उपस्थित होते. समाजशास्त्र विषयाच्या पदवी आणि पदव्युत्तर वर्गाच्या सर्वच विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली
या कार्यक्रमाच्या आयोजनात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .गणेश चंद्र शिंदे यांचेही महत्त्वपूर्ण योगदान होते. त्यांच्या मार्गदर्शनानुसार व्याख्यानाच्या विषयाची निवड करण्यात आली आणि सदरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
डॉ. बाबुराव जाधव यांनी विद्यार्थ्यांना समाजशास्त्राने उपलब्ध करून दिलेल्या शासकीय निमशासकीय आणि स्वयंसेवी संस्था यामधील रोजगाराच्या संधी याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांसोबत प्रश्न उत्तराच्या माध्यमातून सुसंवाद साधला याप्रसंगी अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ. कविता सोनकांबळे यांनी समाजशास्त्राची उपयुक्तता अतिशय समर्पकपणे विद्यार्थ्यांसमोर मांडली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शंकर मार्कंड यांनी केले .तर कार्यक्रमचे आभार प्रा. पूजा मिरगेवार यांनी मानले महाविद्यालयाचा पदवी आणि पदव्युत्तर समाजशास्त्र विभाग आणि या विभागाने विद्यार्थ्यांसाठी दिलेली योगदान या अनुषंगाने प्रास्ताविक पर मनोगत विभागाचे विभाग प्रमुख डॉ. बी एम कांबळे यांनी मांडले . याप्रसंगी गणेश विनकरे या विद्यार्थ्याने समर्पकपणे समाजशास्त्राची उपयुक्तता याविषयीचे बनविलेले भिंती पत्रक याचे अनावरण करण्यात आले.