ताज्या घडामोडी

देशात नव्हे तर विदेशात सुद्धा विद्यार्थ्यांना रोजगार संधी उपलब्ध होणार :डॉ.निळकंठ पाटील

नांदेड: प्रतिनिधी
यशवंत महाविद्यालय येथे अर्थशास्त्र विभागाच्या वतीने सत्र आरंभ कार्यक्रमा संपन्न झाला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिभा निकेतन महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर निळकंठ पाटील यांची उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र कुलगुरू गणेशचंद्र शिंदे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विभाग प्रमुख डॉक्टर पी.आर. मुठ्ठे यांनी अर्थशास्त्र विभागाकडून राबवल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमाविषयी माहिती दिली .

सत्र आरंभ कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर निळकंठ पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अर्थशास्त्र विषयातील रोजगाराच्या संधी यावर सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी असे म्हटले की अर्थशास्त्र हा विषय मानवाच्या जीवनात प्रत्येक क्षणाला उपयोगी ठरणार असून विद्यार्थ्यांनी अर्थशास्त्र विषयात आपले करिअर करावे कारण अर्थशास्त्र हा विषय राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा महत्त्वाचा आहे. अनेक सरकारी आणि खाजगी संस्था आहेत त्यामध्ये विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात एवढेच नाही तर देशातील व विदेशातील बँका यामध्ये विद्यार्थ्यांना सुद्धा त्यामध्ये नोकरीच्या संदर्भात उपलब्ध होतात. त्याचप्रमाणे देशातील विविध स्पर्धात्मक परीक्षा जसे की एम.पी.एससी यूपीएससी यामध्ये सुद्धा विद्यार्थी अर्थशास्त्र विषय घेऊन करिअर घडू शकतात.
]त्याचप्रमाणे वित्तीय संस्था कार्पोरेशन सल्लागार संस्था आदी ठिकाणी सुद्धा विद्यार्थी पात्र ठरू शकतात. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी. यावेळी महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांसाठी व विद्यार्थ्यांच्या हितासाठी राबवल्या जाणाऱ्या जाणाऱ्या विविध शैक्षणिक कार्यक्रमाची माहिती दिली. यावेळी कार्यक्रमाला अर्थशास्त्र विभागातील प्राध्यापक मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर डी डी भोसले यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. ज्ञानेश्वर पुपलवाड यांनी केले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.