ताज्या घडामोडी

शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य न झाल्यास ३ आगष्टला अखिल भारतीय किसान सभा (लाल बावटा). आंदोलन करणार*

परभणी जिल्हा प्रशासनाला लाल बावटा समितीचा ईशारा

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालूक्यातील कष्टकरी शेतकर्‍याच्या पिक कर्जाचे पुनर्गठन करून पिक कर्जाचे तात्काळ वाटप करा व तालूक्यातील शेतकऱ्याला पिक विम्याचे सरसकट वाटप करा अशा मागणीचे निवेदन अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने देण्यात आले असून जिल्हा प्रशासन बघ्याची भूमिका घेणार असेल तर ३ आगष्ट पासून तिव्र आंदोनलन उभारणार असा ईशारा लाल बावटा च्या वतीने जिल्हा प्रशासनाला एका निवेदना द्वारे देण्यात आला या निवेदनावर बाळासाहेब आळणे पाटील , लिंबाजी कचरे पाटील यांच्या सह्या आहेत.

सविस्तर वृत्त असे की, तालूक्यातील कष्टकरी शेतकर्‍यांच्या विविध मागण्या विषयी जिल्हाप्रशासनास एका निवेदनाद्वारे कळविण्यात येते की मानवत तालूक्यातील कष्टकरी शेतकरी यांच्या पीक कर्ज व वीमा या संदर्भात, महाराष्ट्र शासनाने पिक कर्जाचे पुर्नगठण करणयाचा निर्णय घेऊन बैंकाना शेतकऱ्यांना पिक कर्जाचे तात्काळ वाटप करा, अशा सूचना दिलेल्या आहेत, परंतु जूलै महिन्याची 15 तारीख आली असून अद्याप पर्यंत पिक कर्जाच पुनर्गठण करण्याची कार्यवही बँकानी सुरु केलेली नाही. बॅक व्यवस्थापक सरळ सरळ शासनाच्या आदेशाची पायमल्ली करीत आहे. तर दुसऱ्या बाजूला पिक विमा कंपन्या शेतकर्‍यांना सरसकट पिक विमा वाटप करतांना दिसत नाहीत.
तालूक्यातील एखादा दुसर्‍या शेतकऱ्यांना पिक विमा टाकून सर्व कष्टकरी शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा नाहक प्रयत्न पिक विमा कंपन्या करत आहेत. तालूक्यातील शेतकर्‍यांच्या नुकसान झालेल्या पिकाचे अद्याप पर्यंत वाटप नाही.
त्यामूळे एका निवेदना मार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे शेतकर्‍यांच्या विविध मागण्या तात्काळ मार्गी लावा अन्यथा प्रशासनाच्या विरोधात तिव्र आंदोलन उभारावे लागूल अशा ईशार्‍याचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. शेतकऱ्यांच्या खालील मागण्याची पूर्तता करण्या संदर्भात हस्तक्षेप करुन खालील मागण्या पूर्ण करण्याचे आदेश संबंधीत यंत्रणेस देण्यात यावेत, नसता दिनांक 3 ऑगस्ट 2024 रोजी पाथरी, मानवत तालुक्यातील शेतकरी उप जिल्हाअधिकारी, पाथरी येथे तिव्र आंदोलन करतील. मागण्या 1. शेतकऱ्यांच्या पिक कर्जाचे पूर्णगंठण करुन शेतकऱ्यांना तात्काळ पिक कर्जाचे वाटप करा 2. कापुस, सोयाबीन, तुर, मुग, पिकांचा पिक विमा सरसकट शेतकऱ्यांना वाटप करा. 3 नुकसान झालेल्या पिकांचे अनुदान संबंधीत शेतकयांना तात्काळ वाटप करा अशी मागणी बालासाहेब आळणे पाटील, लिंबाजी कचरे पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.