ताज्या घडामोडी

अनुभवलेलं, जगलेलं जीवन प्रामाणिकपणे शब्दबध्द करण्याचा प्रयत्न – देविदास तारु

बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ बिजूर संचलित ड्रीम फिटनेस, स्टुडिओ, भाग्यनगर, नांदेड संवाद पुस्तकाशी अन् गप्पा लेखकांशी

(‘आता म्हव काय ‘ आत्मकथनाच्या प्रकट मुलाखतीतून उलगडला लेखकाचा प्रवास)
नांदेड( प्रतिनिधी): जीवन जगत असताना अठरा विश्व दारिद्र्य समोर होते. एक वेळ खाण्याची आबाळ होती.अनेक खस्ता खात जीवन जगले ,मोठ्या कष्टातून शिक्षण घेतले. आपण जे जगलो.. अनुभवले..ते कुठलाही संकोच न वाचकांसमोर ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याचे मत’ आता म्हव काय ‘ या आत्मकथनाचे लेखक डॉ.देविदास तारु यांनी पत्रकार भारत दाढेल यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत व्यक्त केले.
बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बिजूर आणि
ड्रीम फिटनेस, स्टुडिओ, भाग्यनगर, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि,१६ मंगळवार रोजी
‘संवाद पुस्तकाशी अन् गप्पा लेखकांशी ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यीक देविदास फुलारी,ड्रीम फिटनेस च्या संचालिका रेणुका गुप्ता यांची उपस्थिती होते.
आंतराष्ट्रीय,देश,आणि राज्य पातळीवर अनेक पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या ” आता
मव्ह काय ” या आत्मकथनाचे लेखक डॉ.देविदास तारू यांची प्रकट मुलाखत पत्रकार भारत दाढेल यांनी घेतली.या मुलाखतीमध्ये भारत दाढेल यांनी या आत्मकथनाचे लेखक डॉ. देवीदास तारु यांचा जीवनपट उलगडणारे आणि सदरील लेखनाच्या प्रेरणा यावर आधारित प्रश्न उपस्थित केले.
लेखक तारु यांनी हे आत्मकथन म्हणजे माझा जीवनानुभव असल्याचे सांगत त्यांचे अनुभव अंगावर शहारे आणि गरिबीचे चटके ऐकून डोळ्यात अश्रू उभे करणारे होते.
वाचन संस्कृतीला बळ देणाऱ्या या साहित्य उपक्रमास साहित्य प्रेमीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.भगवान सुर्यवंशी यांनी केले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.