ताज्या घडामोडी

यशवंत ‘ मध्ये श्रद्धेय कै.डॉ. शंकररावजी चव्हाण जयंती वृक्षारोपणाने संपन्न

*’
नांदेड:(दि.१५ जुलै २०२४)
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने दि.१५ जुलै रोजी श्रद्धेय कै.डॉ. शंकररावजी चव्हाण यांची जयंती वृक्षारोपण करून साजरी करण्यात आली.
याप्रसंगी प्राचार्य डॉ गणेशचंद्र एन.शिंदे, प्रमुख पाहुणे पीपल्स कॉलेज येथील राज्यशास्त्र विभागातील डॉ. विशाल पतंगे, उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे आणि डॉ.एच.एस.पतंगे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. कैलास इंगोले, डॉ. राजरत्न सोनटक्के, प्रा. राजश्री भोपाळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. अभिनंदन इंगोले व प्रा. कांचन गायकवाड, प्रा. हुलसुरे, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, प्रा. प्रियंका सिसोदिया, डॉ.अजय गव्हाणे, डॉ. संदीप पाईकराव, डॉ. संजय जगताप, डॉ. वीरभद्र स्वामी तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.