ताज्या घडामोडी

श्रद्धेय कै.डॉ.शंकररावजी चव्हाण जयंतीनिमित्त ‘यशवंत ‘ मध्ये विनम्र अभिवादन

नांदेड:( दि.१४ जुलै २०२४)
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री आधुनिक भगीरथ श्रद्धेय कै.डॉ.शंकररावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र -कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांनी श्रद्धेय कै.डॉ.शंकररावजी चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन केले.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.कबीर रबडे, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका डॉ. एल.व्ही.पदमारानी राव, कु.इरा विश्वाधार देशमुख, कु. स्वराली राजकुमार सोनवणे, डॉ. एस.एस.बोडके, डॉ. एम.एम.व्ही.बेग, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे, पोशट्टी अवधूतवार, विविध विभागाचे विभागप्रमुख, सर्व प्राध्यापकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी देखील विनम्र अभिवादन केले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.