ताज्या घडामोडी

सरदार वल्लभभाई पटेल विद्यामंदीर* विद्यालयात विविध आनंददायी उपक्रम उत्साहात साजरे

मानवत / प्रतिनिधी.

आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत मानोली येथील सरदार वल्लभभाई पटेल विद्यामंदिर विद्यालयात इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मध्यंतरापूर्वी कवायती आणि प्राणायाम तसेच लघु मध्यंतरानंतर वयक्तिक खेळांमध्ये दोरीवरच्या उड्या, तीन टांगी दोर, लिंबू चमचा आणि सांघिक खेळांमध्ये लंगडी, सुरपाट्या, खोखो इत्यादी खेळांचे आयोजन विद्यालयात करण्यात आले होते.
तसेच यावेळी वैयक्तिक स्वच्छता या विषयी मूख्याध्यापक डी.एन. जाधव यांनी महत्वपूर्ण असे मार्गदर्शन केले.
यावेळी शाळेचे ,के.व्ही जाधव, गणेश पी.शिंदे , डी.जे.राऊत , एल.एन.पौळ , बी.पी. भरोसे तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यावेळी क्रीडा स्पर्धा आयोजनात मोलाचे परिश्रम घेतले.

.*

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.