ताज्या घडामोडी

शिवसेना उपजिल्हाप्रमुखपदी प्रमोद तारे यांची निवड*

*

*

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालुक्यातील कोल्हा येथील प्रमोद तारे यांची पाथरी शिवसेना भवनामध्ये अल्पसंख्यांक महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सईद भैय्या खान यांनी प्रमोद तारे यांची शिवसेना परभणी उपजिल्हा प्रमुख पाथरी विधानसभा परभणी पदी निवडीचे पत्र दिनांक 10 जुलै रोजी दिले, यावेळी अनेकांनी प्रवेश घेतला. तारे या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
मानवत तालुक्यातील कोल्हा येथील गेली पंचवीस वर्ष शिवसेनेत काम करीत असलेले तसेच विविध पदावर, सामाजिक संघटनेत, जनसामान्य लोकांत मिसळणारे, शिवसैनिक पत्रकार प्रमोद तारे सर यांची शिवसेना पक्षाने प्रमाणिक कामाची दखल घेऊन. माजी आमदार माणिकराव आंबेगावकर, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अल्पसंख्यांक चे सईद भैया खान, शिवसेना जिल्हाप्रमुख मुंजाभाऊ टाकळकर, यांनी शिवसेना भवन पाथरी माजलगाव रोड येथे दिनांक 10 बुधवार रोजी सकाळी 11 वाजता पक्षप्रवेश व लाडकी बहीण योजना कार्यक्रम आयोजित केला होता.
यामध्ये शिवसेना उपजिल्हाप्रमुखपदी प्रमोद तारे यांची निवड, तर मानवत उपतालुकाप्रमूख पदी विजय नांगरे, केकरजवळ सर्कलप्रमूख मनोहर लाडाने. यांची निवड करण्यात आली. त्यावेळी माजी तालुकाप्रमुख नरसय्या कूरपटवार, सभापती शिवाजी उकलकर , बालाजी दहे शहर प्रमुख, शिवाजी वरकडे तालुकाप्रमुख, दत्ता गवळी युवा सेना तालुकाप्रमुख, सतीश नखाते, नारायण पिंपळे, बाळू उकलकर, आदि शिवसेना मानवतचे पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.