https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मांडेवडगांव ग्राम पंचायतीच्या प्रभागातील विद्यूत पोलची दैणिय अवस्था विज वितरण अधिकार्‍याचे दूर्लक्ष ; अपघात होण्याचे संकेत

प्रतिनिधी: मानवत
मानवत तालूक्यातील मांडेवडगांव ग्राम पंचायतीच्या प्रभागातील विद्यूत पोल ( खांब ) यांची दैनिय अवस्था झाली असून वादळी वार्‍यात तूटण्याची शक्यता विर्तविली जात असून वाकलेले व तूटलेले खांब यांच्या जागी नविन विद्यूत पोल बसविण्याची मागणी तारीख: 24/06/2024
मुख्य कार्यकारी अभियंता, M.R.V.V.V.Co. एम. मानवता यांच्याकडे सरपंच शेळके यांनी केली.
सविस्तर वृत्त असे की,


मानवत तालूक्यात गेल्या अनेक दशकापासून लोबलेल्या तारा वाकडे खांब यांचा प्रश्न प्रलंबित असून याकडे मात्र विज वितरण कंपनीचे दूर्लक्ष होत आहे.
दूरूस्तीच्या नावावर दर वर्षी लाखो रूपये खर्च केल्या जात आहे. पण प्रश्न जेसे थे आहे.
त्यामूळे ग्रामीण भाग हा नेहमीच अंधारात असतो. असाच प्रश्न तालूक्यातील मौजे मांडेवडगाव येथील गावठाणातील 3 विद्युत पोल व शेतातील (कदम डिपी) 2 विद्युत पोल मोडकळीस आल्यामुळे त्याच जागी तात्काळ नविन विद्युत पोल टाकण्यात यावे अशी मागणी महिला सरपंच सौ सविताताई शेळके यांनी विज वितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे केली.
मानवत तालूक्यातील मांडेवडगांव ग्रामपंचायत व मौजे मांडेवडगाव हद्दीतील सार्वजनिक रहिवास ठिकाणचे गावठाण मधील 3 विद्युत पोल व शेतातील (कदम डिपी) 2 विद्युत पोल मोडकळीस झाले आहेत व त्यामुळे अत्यंत चिंतादायक स्थिती निर्माण झाली आहे व सध्या वारा-पाऊसाचे दिवसमान आहेत यामुळे जिवीत हाणी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. याअगोदर सुध्दा आपल्या कार्यालयात विनंती केली परंतु अद्याप पर्यंत विद्युत पोल बदलुन दिले नाहीत. जर यामुळे काही जिवीतहानी झाल्यास त्यास आपण व आपले लोककल्याणकारी प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहिल याची गांभीर्याने नोंद घ्यावी असा ईशारा निवेदनात दिला असून याकडे विज वितरण कंपनीचे अधिकारी डोळे झाकून बसले आहे. का ? असा प्रश्न
सरपंच- सविता सखाराम शेळके ग्राम पंचायत कार्यालय, मांडेवडगाव यांनी व्यक्त केला आहे.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704