https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

शिवशाही बसला लागली घरघर ! भाडे जादा सेवा सुविधेचा आभाव* *आगार प्रमूखांची मनमानी / खराब बसेस धावतात बीड परभणी मार्गावरच

मानवत:प्रतिनिधी(अनिल चव्हाण)
आज मानवत बसस्थानकांत किल्लेधारूर डेपोची शिवशाही बस दाखल होताच प्रवांशांनी एसी. विषयी तक्रार केली त्या वेळी चालकांनी एसी चालत नाही त्यामूळे ते बद आहे. असे सांगीतल्याने सर्व प्रवाशी शिवशाहीतून उतरून दूसर्‍या बस मध्ये महिला वाहक यांनी प्रवांशाना बसवून दिले पण त्यामूळे शिवशाहीचे भाडे देऊन साध्या बसने प्रवाशांना प्रवास करावा लागला त्यामूळे प्रवाशांची हेळसांड झाली.*
*सविस्तर वृत्त असे की,

*राज्य परिवहन महामंडळात शिवशाही बसेस मोठ्या दिमाखात दाखल झाल्या प्रवांशांनी पण भाड्याची पर्वा न करता बस सेवेला पसंदी दिली.*
त्यामूळे बीड परभणी मार्गावर मोठ्या प्रमाणात शिवशाही धावतात. पण शिवशाहीची सुविधा प्रवाशांना मिळत नाही. याकडे आगार प्रमूखाचे दूर्लक्ष असल्यामूळे अनेक शिवशाही बसेसला घरघर लागली आहे. अशीच एक MH09 EM2231 बीडजिल्हातील ( किल्लेधारूर डेपोची शिवशाहीचे एसी बंद पडल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. प्रवाशी व चालक वाहक यांची खडाजंगी मानवत बसस्थानकात पाहावयास मिळाली त्यामूळे शिवशाही ही अखेरची घटका मोजत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. या सेवेकडे राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकार्‍यांनी लक्ष न दिल्यास प्रवाशांना खाजगी वाहतूकीचा आधार घ्यावा लागेल असे प्रवाशांमधून बोलल्या जात आहे.

*MCR NEWS / अनिल चव्हाण मानवत*

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704