https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

आला पावसाळ्यात लहान मुलांचे आरोग्य सांभाळा डॉ.विठ्ठल काळे*

*मानवत / प्रतिनिधी.

राज्यात सर्वत्र दमदार तर कूठे धूआॅधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसाळ्यात अनेक आजाराची लागन होत असते तर महत्वाची बाब म्हणजे पावसाळ्याच्या वातावरणात लहान मुलांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. त्यांच्यात सर्दी, ताप, उलट्या, जुलाब यासारखे आजार बळावतात. या दिवसात दूषित पाण्यापासून सावध राहा. घर आणि परिसरात घाण साचू देऊ नये, तसेच आपला परिसर स्वच्छ ठेवावे..
थंड हवेचा संपर्क टाळा. बाळाचे केस आणि त्वचा कोरडी ठेवा.नवजात बाळाला संसर्गापासून वाचवण्यासाठी त्याला स्तनपान करा. कारण स्तनपानामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि संसर्गाचा धोका कमी होतो…
घरात पूर्ण स्वच्छता ठेवा. खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवा जेणेकरुन संसर्ग डास आणि माश्यांद्वारे पसरु नये.
बाळाला जाड सुती कपड्यांचा वापर करा आणि वापरण्यापूर्वी कपडे पूर्णपणे उन्हात वाळलेले किंवा इस्त्री केलेले आहेत याची खात्री करा… अशी प्रतिक्रिया मानवत येथील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. विठ्ठल काळे यांनी दिली आहे…..
पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने दिवसभर ढगाळ वातावरण कधी ऊन, तर कधी रिमझिम पाऊस अशा या वातावरणातील बदलाचा थेट आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यातून व्हायरल इन्फेक्शन, ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी अन् कणकणीने नागरिक त्रस्त झाले आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयासह बहुतांश खासगी रुग्णालयात उपचारासाठी नागरिकांची गर्दी पाहावयास मिळत आहे.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704