https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

राजपूत समाजाबद्दल अपशब्द बोलणाऱ्या लक्ष्मण हाके वर कारवाई करा* *(( सकल राजपूत समाजाचे मुख्यमंत्र्यांना तहसीलदार पांडूरंग माचेवाड यांच्या मार्फत निवेदन

मानवत / प्रतिनिधी

लक्ष्मण हाके यांनी एका वृत्त वाहिनीला मत व्यक्त करताना राजपूत समाजा बद्दल अपशब्द बोलल्याने राज्यातील राजपूत समाज संतप्त झाला असून समाजाच्या भावना दूखावणार्‍या लक्ष्मण हाके वर कारवाई करावी अशी मागणी आज दिनांक २८ जून रोजी दुपारी १ वाजता मानवत शहरासह तालूक्यातील सकल राजपूत समाजच्या वतीने राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तहसीलदार यांच्या मार्फत एका निवेदना द्वारे करण्यात आली .
सकल राजपूत समाज यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद केले की तथाकथित लक्ष्मण हाके हे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी राजपूत समाजाबद्दल गरळ ओकत आहेत.
वास्तविक पाहता राजपूत समाजाने अद्याप पर्यंत कोणाच्या ही आरक्षणआंदोलनाला विरोध दर्शवला नाही किंबहुना कोणत्या ही आरक्षणाच्या आंदोलनाला आपला पाठिंबा देखील दर्शवला नाही.
राजपूत समाज हा कोणाच्याही मध्ये येत नाही. असे असताना देखील लक्ष्मण हाके यांनी टीव्ही ९ या वृत्त वाहिनीला बोलताना व्ही. जे. एन. टी मध्ये राजपूत भामटा हा समाज बोगस प्रमाणपत्रे काढून व्ही. जे. एन. टी मधील लोकांवर अतिक्रमण करीत आहे असे वक्तव्य केले.
वास्तविक पाहता १९६० पासून महाराष्ट्र राज्य शासन राजपूत भामटा या समाजाला जातीचे प्रमाणपत्र सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्या नंतर देण्यात आलेले आहेत. तसेच बहुतांश प्रमाण पत्रांच्या जात वैधता देखील झालेले आहेत. असे असताना देखील राजपूत भामटा समाजाला विनाकारण घेऊन पडत आपली स्वतःची प्रसिद्धी मिळवण्याचा खटाटोप तथाकथित लक्ष्मण हाके यांनी केलेल्या दिसून येतो. यामुळेच महाराष्ट्र शासनाच्या महसूल प्रशासनाच्या कार्यप्रणाली वरच एक प्रकारे त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला असल्याकारणाने संबंधिता विरोधात शासनाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. लक्ष्मण हाकेच्या विरोधात कारवाई न झाल्यास राजपूत समाज रस्त्यावर उतरेल व होणाऱ्या आंदोलनात कायदा व सुव्यवस्था बिघडली तर त्यास सर्वस्वी कर्तव्यदक्ष महाराष्ट्र शासन जबाबदार राहील असे निवबेदनात म्हटले आहे .
यावेळी निवेदनावर राणासंजयसिंह नाईक,रेनकोजी दहे , प्रतापराव सोरेकर ,शिवसेना शहर प्रमुख बालाजी दहे ,शंकर कच्छवे ,धनंजय दहे ,गोविंद दहे ,किरण लाड , संकेत कच्छवे , विजय मोरे , गणेश दहे ,गोपाळ दहे ,बळीराम चव्हाण ,अॅड विक्रम दहे , शिवसेना शहर प्रमुख किशोर चव्हाण , अनिल दहे , अमोल कच्छवे , प्रद्युम्न दहे ,अनिल राजेश दहे,अविनाश दहे , राजन चौहान,आकाश दहे, अभिजीत दहे, शामसिंह दहे, अजयसिंह मोरे , रतनसिंह दहे , गजानन चौहान , गणेश गोलाईत , राम कच्छवे ,सचिन चौहान, मोहनसिंह ठाकुर , वामनसिंह गोलाईत , वामन चव्हाण, रोहीत बैस , प्रमोदसिंह राठोड परदेशी,एड् मुकुंद पाटील , ज्ञानोबा देहे सुरेश गोलाइत ,आदीत्य दहे, रोहीत कुऱ्हाडे , सचिन दहे , मयूर बैस , भीमसिंह दहे , बाळू दहे व केशव दहे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704